ठेकेदारांच्या काम चुकारपणा मुळे पडला रस्त्यावर खड्डा

रुद्रायणी फाटा येथे रस्त्याचे काम सुरू असता ठेकेदाराच्या चुकीच्या कामामुळे शेतकऱ्याचा मालाचा ट्रक पलटी झाला आहे, आज ट्रक पलटी झाला उद्या काही पण होऊ शकते या रस्त्याने विद्यार्थ्यांच्या स्कूल बस सुद्धा जातात, अकोला वाशिम मेन रस्त्याचे कंत्राट मॉन्टे कार्लो या कंपनीने ठेका घेतला असुन रस्ते विकास मंडळ, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे असुन त्या कामावर देखरेख अभियंता श्री प्रशांत ढवळे यांची असल्याचे समजते त्यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही व काम सुरू असता सदर ठेकेदाराने वरखेड व जलालाबाद या शिवारातील मुरूम नेला व वरखेड ते रुद्रायणी फाटा येथील रोड एकदम खराब करून ठेवलेला आहे त्यामुळे रस्त्याचे नुकसान होत आहे पण रुद्रायणी फाट्याजवळ गेल्या तीन महिन्यापासून मधोमध खड्डा पडला असून त्या खड्ड्याचा पुष्कळ त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे नागरिकांकडून लवकरात लवकर रस्त्याचे आणि नालीचे काम करावे अशी मागणी करत आहेत