किरकोळ अपवाद वगळता अतिक्रमण निर्मुलन मोहीम शांततेत...
किरकोळ अपवाद वगळता अतिक्रमण निर्मुलन मोहीम शांततेत... बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी :- आज दिनांक-०१/१०/२०२६ रोजी बार्शिटाकळी शहरातील अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम नियोजनाप्रमाणे यशस्वीपणे प्रारंभ करण्यात आली. आजची मोहीम खडकपुरा चौकापासून प्रारंभ करण्यात आली ती खोलेश्वर मंदीर रोड पर्यंत राबविण्यात आली. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण पोकलँड व जे.सी.बी.च्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. यावेळी काही लोकांनी स्वत:हून आपले अतिक्रमण काढून घेतल्याचे दिसून आले, तर उर्वरीत अतिक्रमणे नगर पंचायतच्या वतीने हटविण्यात आली. आजच्या मोहिमेत मो.जाहीर मो.शरीफ यांनी त्यांच्या अतिक्रमण पाडण्याच्या विरोधात मा.दिवाणी न्यायालय अकोला येथे नगर पंचायत विरोधात दावा दाखल केला होता आणि नगर पंचायतच्या या मोहिमेला स्थगिती मिळविली होती.त्यावर दिनांक-३०/०९/२०२६ ला सुनावणी होऊन दिनांक-०१/१०/२०२६ रोजी सदर स्थगिती बाबतचा दावा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. त्यानंतर सदरचे अतिक्रमण निष्कासित करण्यात आले. यावेळी सदर अतिक्रमण धारकांनी पोलिस प्रशासनाशी बाचाबाची केल्याने त्यांच्यावर पोलिस प्रश...