👉सात हजार बुडत्या जीवांना वाचविणारा 'दीपक'! 👉 पिंजरच्या दिपक सदाफळे यांचा आदर्श...
👉सात हजार बुडत्या जीवांना वाचविणारा 'दीपक'! 👉 पिंजरच्या दिपक सदाफळे यांचा आदर्श बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : पावसाळ्याच्या दिवसांत कुणी पुरात वाहून जातो, नदीत आत्महत्येचा प्रयत्न करतो. पा बुडत्या जीवांना वाचविण्यासाठी सत्पर असलेले वऱ्हाडातील नाव म्हणजे दीपक सदाफळे, बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर गावातील दीपक यांनी जवळपास ६ हजार ९६७ जीव वाचविले आहेत, ३ हजार ७२२ मृतदेह शोधून बाहेर काढले. अमरावती विभागच नवो तर संपूर्ण राज्यात आणि बाहेरही त्यांनी ही सेवा दिली आहे. कुठलीही आर्थिक मदत न घेता तांचे हे सेवाकार्य मागील २५ वर्षापासून सुरू आहे. घरची बेताची परिस्थिती असल्याने संकटे अनेक आली. मदतीसाठी गेल्यानंतर उपेक्षाच पदरी पडली. पावलोपावली हा अनुभव येत गेल्याने आपण भविष्यात अशा अडलेल्यांना मदत करावी, असा चंग बाधला. १९९८ मध्ये या सामाजिक कार्याची सुरुवात केली. आज दीपक सदाफळे यांनी तब्बल ८० शाखांचे जाळे विणले आहे, त्यांच्यासोबत ३ हजार ६६० स्वयंसेवकांची चमू आहे. या चमूमध्ये दहा मुलीचामुद्धा समावेश आहे, कुठलेही संकट असले तरी ही चमू मदतीसाठी तत्पर असते. मानव से...