बहुसंख्य कर्मचारी संघटनांचा संप शिथिल परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या नगरविकास विभागातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू.....
बहुसंख्य कर्मचारी संघटनांचा संप शिथिल परंतु मुख्यमंत्री महोदयांच्या नगरविकास विभागातील कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू..... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारने ही राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना UPS योजना लागू करण्याबाबत घोषणा केलेली असल्यामुळे राज्यातील बहुसंख्य कर्मचारी/अधिकारी संघटनांनी कामबंद आंदोलन स्थगित केलेले आहे परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागातील महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकाऱ्यांना शासनाच्या अधिनियमानुसार राज्य शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा दिलेला आहे. त्यास नगर विकास विभागाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे व त्यानुसार सदर अधिकाऱ्यांना सेवार्थ आयडी देणे बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे गेला असता वित्त विभागाने सदर अधिकारी शासकीय कर्मचारी नसल्याबाबतची तृटी काढून राज्यातील अंदाजे 3000 संवर्ग अधिकाऱ्यांना सेवार्थ आयडी पासून वंचित ठेवले. सदर अधिकाऱ्यांपैकी बरेच अधिकारी 2010-2012 पासून कार्यरत असून अद्याप पर्यंत त्यांना जुनी पेन्शन/ नवी पेन्शन यापैकी कुठल्याही पेन्शन...