"लैंगिक" अत्याचारा विरोधात जमाते इस्लामी हिंद महिला, महिला सभ्दावना मंच, महिला आर्थिक विकास मंडळ बार्शिटाकळीच्या वतीने निवेदन.....

"लैंगिक" अत्याचारा विरोधात जमाते इस्लामी हिंद महिला, महिला सभ्दावना मंच, महिला आर्थिक विकास मंडळ बार्शिटाकळीच्या वतीने निवेदन.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : जमाते इस्लामी हिंद महिला विभाग बार्शिटाकळी, महिला सद्भावना मंच बार्शिटाकळी, महिला आर्थिक विकास मंडळ बार्शिटाकळी च्या वतीने अक्षय गंगाधर नागे साहेब नायब तहसीलदार बार्शीटाकळी मार्फत जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन सादर केले, निवेदनात
अकोला,बदलापूर येथील लहान मुलींचे लैंगिक शोषण तसेच पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आर.जी. कर मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षु डॉक्टरच्या बलात्कार-हत्या प्रकरणाचा निषेध व कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 
बदलापूर प्रकरणात, आम्ही आरोपींविरुद्ध त्वरित खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी करतो. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या अधिकाऱ्यांना सुरक्षा आणि संरक्षानिष्कर्षांचे पालन न केल्याबद्दल (स्त्री परिचारिका आणि सीसीटीव्ही कॅमेरे नसणे) दोषी ठरवून कारवाई करण्यात यावी. ज्या पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यात उशीर केला त्या बदलापूर पोलिस अधिकाऱ्यांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
कोलकातामधील प्रशिक्षु डॉक्टर प्रकरणात, पीडितेचे शरीरावर अनेक जखमां आढळले लैंगिक अत्याचाराचे आणि गळा आवळल्याचे पुरावे आहेत.
या दोन्ही गुन्ह्यांच्या भयंकर स्वरूपामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे आणि भारतातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा तातडीने चर्चेला घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, विशेषतः शाळा, महाविद्यालये आणि काम करणाऱ्या मुली आणि महिलांमध्ये.
आम्ही खालील मुद्द्यांवर तात्काळ आणि ठोस कारवाईची मागणी करतो. १)साखोल चौकशी व पीडितांना  न्याय, २) सुरक्षा उपायांचा विकास.३) जनजागृती मोहीम, ४) पीडितांना सहायता, ५) कायदा अंमलबजावणीतील जबाबदारी, ६) सदाचरण इत्यादी मुद्देसा निवेदन देण्यात आला. निवेदन देताना जे आय एच महिला तर्फे अमेना नूर, रुबीना कौसार, सोबीया समीना, सफिया खानम, रजिया बानो, तरन्नुम परवीन, शमा नसीब, मेराज ईरम,  फरहाना मुदस्सिर डॉ, सुलभा ठक डॉ, शायबा तनवीर,डॉ, उजमा आयशा, अनीता सुनील शिरसाट, सद्भावना मंच तर्फे अनिता दादाराव जामनिक, मंदाताई वानखडे , अंजली जामनिक, मनीषा जामनिक महिला आर्थिक विकास मंडळा तर्फे नेहल समीर शेख, उषाताई , आशाताई , प्रज्ञाताई , राधाताई ,उज्वला ताई गडलींग , वीणाताई मोहोड , मनीषा ताई, शिल्पाताई भातखडे , शांता ताई , यशोमती ताई , आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे