बाळासाहेब आंबेडकर यांनी आज अकोल्यातील आशिया खंडातील अग्रण्य व देशांतर्गत 10 हजार फार्मा कंपन्यातून 169 व स्थान प्राप्त जागतिक स्तरावर USA FDA ची समकक्ष लेबेन लाईफ सायन्सेस प्रा.ली.अकोला येथे भेट दिली

बाळासाहेब आंबेडकर यांनी आज अकोल्यातील आशिया खंडातील अग्रण्य व देशांतर्गत 10 हजार फार्मा कंपन्यातून 169 व स्थान प्राप्त जागतिक स्तरावर USA FDA ची समकक्ष लेबेन लाईफ सायन्सेस प्रा.ली.अकोला येथे भेट दिली लेबेन ही कंपनीचा जागतिक दर्ज्याचा मानवी औषधी निर्माण करणाऱ्या या प्रकल्पात भारतातील १८ राज्यात जवळपास २०० विक्री प्रतिनिधी,प्रकल्पामध्ये २०० कामगार,अधिकारी कार्यरत असुन विदेशातील १२ देशांमध्ये औषधी निर्यात करण्याची प्रक्रिया सुरु आहे .संस्थेला आजपर्यंत जिल्हापातळीपासून आंतरराष्ट्रीय दर्ज्याची २३ पुरस्कार प्राप्त झालेली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडून संस्थेला उत्कृष्ट उत्पादन पद्धतीकरिता WHO-GMP प्रमाणपत्र मिळालेले आहे. नुकतेच संस्थेला इथिओपिया देशाकडून निर्यातीचे प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त झाले आहे. या प्रकल्पाचे मालक श्री हरेश भाई शाह आणि त्यांचे सुपुत्र मनन शाह यांनी बाळासाहेबांचे स्वागत केले. साहेबांनी पूर्ण प्रकल्प बारकाईने बघितला आणि प्रकल्पातील व्यवस्थापकीय आणि श्रम विभागातील कर्मचाऱ्यांनी साहेबांचे उत्स्फूर्तपणे जागोजागी स्वागत केले. या ...