पातोंडा वनजमीन आणि एका वडार समाजातील माणसाचा मृत्यू

पातोंडा वंनजमीन आणि एका वडार समाजातील माणसाचा मृत्यू…
हिंगोलीः आज वंचितांचे आणि बहुजनांचे नेते श्रद्धेय  ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी पातोंडा गावाला प्रत्यक्ष भेट देऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले आणि अमानुषपणे गरिबांवर अत्याचार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर CID चौकशी लावून कार्यवाही करावी अशी मागणी केली. या प्रसंगी पीडितांच्या पाठीशी  वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. तसेच राज्यपाल याना भेटून या घटनेची चौकशी करावी असे आश्वासन त्यांनी दिले। वंचित समूहाच्या उद्धारासाठी आणि रक्षणासाठी एक आंबेडकर पुन्हा एकदा मैदानात उतरल्याने आता पीडितांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज ही घटना घडून तब्बल 25 दिवस झाले परंतु कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींनी साधी विचारपूस सुद्धा केली नाही. परंतु वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेते मा. रवींद्र वाढे, ज्योतिपाल रणवीर आदी नेत्यांनी भेट देऊन या घटनेचा लेखाजोखा पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या निदर्शनात आणून देऊन पीडित्यांच्या न्यायाची मागणी केली. काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत जसे-
1.आजपर्यंत पीडित महिला पुरुष याना झालेल्या अमानुष मारहाणीचे FIR दाखल करून घेतले नाहीत.

2. महिलांना पुरुष अधिकाऱ्यांनी अमानुष मारहाण केली परंतु त्यांच्या तक्रारी पोलिसांनी दाखल करून घेतल्या नाहीत.

3. हे प्रकरण 1 लाख रुपये देऊन मिटविण्याचे कारण काय?

4. वडार समाजाने सरपंच पद सोडल्यास हे प्रकरण मिटून घेऊ असे गावातील हटकर समाजाचे काही लोक म्हणतात याचा अर्थ काय?

5. न्यायालयात दावे दाखल असताना या गावाच्याच शेतमजुरांवर वनविभागाने कार्यवाही का केली?

6. मृत व्यक्तीच्या पत्नीचे म्हणणे आहे की तिच्या पतिने विष घेतले नव्हते, त्याचा मृत्यू हा मारहाणीत झालेला आहे. पण वनविभागाने हे प्रकरण दाबण्यासाठी पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली असा बनाव केला.

6.यासाठी डॉक्टरवर सुद्धा दबाव आणला असावा हे नाकारता येत नाही.

7.वन विभागाने केवळ या गावाच्या शेतमजुरी करणाऱ्या लोकांनी वनपट्ट्यावर कार्यवाही करण्याचे कारण काय?

8. वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि बासंबा पोलीस स्टेशन चे इंचार्जे यांचेवर हे प्रकरण मिटविण्यासाठी कोणाचा दबाव होता? 

9. त्यामुळे वयक्तिक FIR दाखल करून घेणे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.

आज श्रद्धेय बाळासाहेबांनी भेट देऊन या सर्व प्रकरणाला खऱ्या अर्थाने वाचा फोडली. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे