न.प.बार्शिटाकळी व्दारे घरगुती कंपोष्ट खत व पारसबाग बाबत कार्यशाळा

*न.पं. बार्शी टाकळी  व्दारे घरगुती कंपोस्ट खत व परसबाग बाबत कार्यशाळा संपन्न.*



 बार्शिटाकळी नगर पंचायत व्दारे आयोजित भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त माझी वसुंधरा २.० व स्वच्छ संरक्षण २०२२ तसेच माहिती, शिक्षण व संवाद उपक्रमा अंतर्गत घरगुती ओल्या कचऱ्यापासुन कंपोस्ट खत तयार करुन परसबाग तयार करणे.याकरिता एक दिवसीय कार्यशाळा व प्रशिक्षण दि.१२  जानेवारी २०२२ बुधवार ला वेळ सकाळी ११ ते ०५ वाजे पर्यंत नगर पंचायत सभागृह कोविड १९ चा त्रिसूत्री नियमांचे पालन तिसजनाचे उपस्थित संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक व अध्यक्षस्थानी न.पं नगराध्यक्ष महेफुज खान रसुल खान होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे न.पं उपाध्यक्ष सुरेश जामनिक,आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाट, न.पं.मुख्याधिकारी स्नेहल रहाटे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक युवाश्री विशाल राखोंडे नगरसेविका व नगर सेवक उपस्थित होते.. 
        यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेच पुजन व हार अर्पण करून सर्व मान्यवरांनी दिप प्रज्वलन केले उपस्थित सर्व मान्यवारांचे स्वागत परसबाग बियाणे व प्रशिक्षण किट तसेच वृक्ष देऊन केले तर सर्व उपस्थित  प्रशिक्षणार्थी  मान्यवरांचा हस्ते, मास्क, कापडी पिशवी,पेन,नोटबुक व किचन गार्डन किट देण्यात आली. यावेळी प्रथम सत्रात कचरा लाख मोलाचा व चार प्रकार कचरा वेगवेगळा करुन घरगुती ओला कचऱ्यापासुन कंपोस्ट खत तयार करणे  याबाबत नगराध्यक्ष महेफुजखान आरोग्य सभापती सुनिल शिरसाठ आणि युवाश्री विशाल राखोंडे यांनी  मार्गदर्शन केले.. 
         माझी परसबाग तसेच झिरो बजेट किचन गार्डन परसबाग घरच्या घरी कश्या प्रकारे निर्माण करता येते याबाबत परिपुर्ण माहिती व संवाद मनोरंजन खेळाच्या व चित्रफिती व्दारे प्रशिक्षण देण्यात आले तसेच कार्यक्रमात स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा २.० बाबत परिपूर्ण माहिती आरोग्य अभियंता योगेश तायडे यांनी दिली तसेच सुखदेव उपरवट यांनी कचरा सुरांची भुमिका घेऊन जनजागृती केली.शेवटी  प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले व कार्यक्रमाचे संचालन साने गुरुजी मंडळाचे अध्यक्ष सागर राखोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी पवार यांनी करुन कार्यशाळेची सांगता केली आणी माझी वसुंधरा व स्वच्छतेची शपथ घेतली हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नगर पंचायत बार्शिटाकळी चे सर्व अधिकारी कर्मचारी  यांनी परिश्रम घेऊन कार्यशाळा यशस्वी केली. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे