किशोर अडागळे सारखे सैनिक भारत देशाचे खरे हिरो - बाळासाहेब आंबेडकर
किशोर अडागळे सारखे सैनिक भारत देशाचे खरे हिरो - बाळासाहेब आंबेडकर प्रतिनिधी श्रावण भातखडे अकोला - देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा पराक्रम अकोला जिल्ह्याचे सुपुत्र असलेले भारतीय सैन्य दलातील हवालदार किशोर गणेश अडागळे यांनी केला आहे. या प्रकाराबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले असुन अश्या सैनिकांनमुळे भारत देश शत्रू पासून सुरक्षित आहे हेच भारतीय सैनिक भारत देशाचे खरे हिरो आहेत. असे गौरवोद्गार वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष आदरणीय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी आज यशवंत भवन येथे उमेश सुरेशराव इंगळे यांच्या पुढाकाराने व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली किशोर अडागळे यांचा सत्कार पार पडला त्या वेळेस बाळासाहेब बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंद भिरड साहेब, माजी नगरसेवक रामाभाऊ तायडे, चांदुर सर्कल चे युवा कार्यकर्ता सिध्दांत वानखडे, वैभव गवई, ईश्वर अडागळे प्रामुख्याने उपस्थित होते