बसस्थानक झुडपाच्या विळख्यात! ■ एसटी महामंडळाचा सैराट कारभार प्रवाशांचे हाल ■ लाखो रूपये खर्चनही प्रवाशांचे हाल

बसस्थानकात झुडपाच्या विळख्यात!

■ एसटी महामंडळाचा सैराट कारभार प्रवाशांचे हाल ■ लाखो रूपये खर्चनही प्रवाशांचे हाल

बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद वाक्य असलेल्या एसटी महामंडळाच्या जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे लाखो रुपये शासनाचे खर्च होऊनही प्रवाशांच्या नशिबी हालच येत आहेत. धाबा येथील संपूर्ण बसस्थानक परिसरात गवत, झाडे झुडपांचे अतिक्रमण झाल्याने हे बसस्थानक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

बार्शिटाकळी तालुक्यातील धाबा हे गाव आहे. या गावातून अनेक महत्त्वपूर्ण रस्त्यावरून एसटी महामंडळाच्या बसेस धावत आहेत. जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून धाबा गावात लाखो रुपये खर्च करून राज्य शासनाने सुसज्ज इमारतीची निर्मिती करून सर्व सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्या. सुरुवातीला या ठिकाणी एसटी बसेस येत होत्या, प्रवासीसुद्धा विसावा घेत होते. या ठिकाणी पद्धतशीरपणे कामकाज चालायचेः परंतु गेल्या अनेक वर्षांपासून सदर बसस्थानकाच्या आवारात एसटी बसेस येत नसून बाहेरूनच आत आहेत. तसेच प्रवासी उघड्यावर चौकात ताटकळत एसटी बसची प्रतीक्षा करीत असतात. दर महिन्याला हजारो रुपयांचा पगार घेणाऱ्या जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या जबाबदार अधिकारी वकर्मचारी तसेच या गावातून ये-जा करणारे एसटी महामंडळाचे चालक-वाहक यांचेसुद्धा याकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी हे त्यांचे ब्रीद वाक्य असले तरी एसटी महामंडळ प्रवाशांच्या व जनतेच्या जीवावर उठले आहे.

एसटी बसेस जातात बाहेरूनच !

प्रवाशांचे ऊन, वारा व पावसापासून संरक्षण व्हावे, या उदात्त हेतून शासनाने लाखों रूपये खर्च करीत सुसज्ज बसस्थानक निर्माण केले. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज या बसस्थानकाला अवकळा आली असून, सर्वत्र गवत, झाडे, झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे एसटी बसेस आतमध्ये न येता बाहेरूनच जाणे पसंत करीत आहेत. त्यामुळे प्रवाशीही रस्त्यावर उभे राहून बसेसची प्रतीक्षा करतात.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे