महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला यांच्या वतीने आरोग्य सेविका सलोनी पोटे यांना निरोप...
महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला यांच्या वतीने आरोग्य सेविका सलोनी पोटे यांना निरोप...
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागातून 38 वर्ष सेवा देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र कापशी अंतर्गत गोरेगाव खुर्द उपकेंद्रावर आरोग्य सेविका पदावर असलेल्या सलोनी अशोकराव पोटे हे आपल्या नियत वयानुसार नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. त्यावेळी हिंगणा फाटा अकोला येथे त्यांच्या राहत्या घरी सेवानिवृत्ती कार्यक्रम समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमांमध्ये त्यांचा महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवानिवृत्तीचा सत्कार घेण्यात आला . यावेळी संघटनेचे अध्यक्ष संगीता जाधव, जिल्हा सरचिटणीस संजय डाबेराव ,जिल्हा सल्लागार उजिळेताई,नाफडेताई, गावंडेताई, सुशिला मालोकार उपस्थित होत्या, अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागात अनेक वर्ष कार्य केल्यानंतर ग्रामीण भागातील जनतेला अहोरात्र सेवा दिल्या आरोग्य सेविकावर कार्यरत होत्या, तसे अकोला आरोग्य कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक होत्या ,संघटनेसाठी सतत प्रयत्न करणाऱ्या श्रीमती सलोनी ताई पोटे यांचा संघटनेच्याया वतीने सेवानिवृत्तीचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,
Comments
Post a Comment