डेंग्यूने केला कहर घेतला एकाचा बळी. बार्शीटाकळी तालुक्यातील घटना..
डेंग्यूने केला कहर घेतला एकाचा बळी. बार्शीटाकळी तालुक्यातील घटना
उजळेश्वर गावात १६-१७ नागरिकांना डेंग्यूची लागण . जिल्हा परिषदेकडे नागरिकांची तक्रार
जिल्हा परिषद अकोला येथे ग्रामस्थांकडून तक्रार दाखल .
परिस्थिती नियंत्रणात असल्याचा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा दावा
बार्शीटाकळी : तालुक्यातील उजळेश्वर येथे डेंग्यूच्या साथी मुळे एका नागरिकाचा मृत्यू.
सविस्तर वृत्त असे की बार्शीटाकळी तालुक्यातील उजळेश्वर येथे गेल्या काही दिवसापासून डेंग्यूची साथ सुरु झाल्याची ,उजळेश्वर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे केलेल्या तक्रारीत नमूद आहे.
ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे गावात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुंबल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी व काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार गावात धुर फवारणी सुरु केली आहे. एक मृत्यू झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाला आज जाग आली आणि त्यांनी नाल्या साफसफाई सुरु केली. तसेच डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत याबद्दल प्रशासनाला कळविले.
गावातील नागरिकांना दैनंदिन सोईसुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरली असे म्हटले तर वावगे ठरु नये.ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिलेल्या तक्रारी असेही नमूद आहे की उजळेश्वर गावातील १६-१७ नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यातील एका दोघांना दवाखान्यातुन सुट्टी मिळाली तर ईतर खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. दुर्दैवाने ह्या रुग्णांपैकी यशवंत मोतीराम राठोड यांचा डेंग्यूने आज दि.१९ ऐप्रील २०२४ रोजी मृत्यू झाला. त्यामुळे उजळेश्वर गावात ह्याबाबत भीतीचे वातावरण पसरल्याची सुत्रांची माहिती आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन नियमीत तपासणी व्हावी. स्थानिक प्रशासनाने स्वच्छतेवर भर द्यावा जेणेकरून अशा साथीच्या रोंगाचा प्रकोप होणार नाही. व कुणाचा नाहक बळी जाणार नाही अशी जनमानसात चर्चा ऐकायला येते. यापूर्वी सुद्धा तालुक्यातील वाघा गड येथे डेंग्यूचे रुग्ण आढळले होते.
चौकट
डेंग्यू म्हणजे काय ?
डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. प्रामुख्यानं डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते. डेंग्यू किंवा डेंगी – हा शब्द आलाय स्वाहिली भाषेतल्या ‘Ka-dinga pepo’ या शब्दांवरून. याचा अर्थच होतो cramp-like seizure म्हणजे पिळवटून दुखणं.
चौकट
असा करावा प्रतिबंध ….
घरांच्या अवती-भवती अथवा टेरेस वर पडलेल्या रिकाम्या कुंड्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वास्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशी ठिकाणे नष्ट करावीत.
खिडक्यांना जाळ्या बसवून (स्क्रीनिंग करून) घरात किंवा कार्यस्थळी डासांच्या शिरकावास प्रतिबंध करावा. आपल्याला डास चावणार नाहीत यासाठी सर्वतोपरी बंदोबस्त करावा. आजाराची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
चौकट
आरोग्य विभागाचे पथक तेथे भेट देणार आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उजळेश्वर गावात धुर फवारणी सुरु आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मी स्वतः तेथे जाऊन ,तेथील परिस्थितीचा आढावा घेइल.
डॉ. रवींद्र आर्या
तालुका आरोग्य अधिकारी
बार्शिटाकळी जि अकोला
Comments
Post a Comment