मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उतरलेल्या काही भावी आमदाराची बार्शिटाकळी तालुक्याकडे पाठ....? मतदारांचा आरोप
मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत उतरलेल्या काही भावी आमदाराची बार्शिटाकळी तालुक्याकडे पाठ....? मतदारांचा आरोप बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन तालुक्याचा समावेश आहे, एक बार्शिटाकळी अजून दुसरा मुर्तीजापुर ,अशा दोन तालुक्याचा समावेश असताना या मतदारसंघात भावी आमदार म्हणून रिंगणात उतरलेल्या काही भावी उमेदवाराचे बार्शिटाकळी तालुक्याकडे दुर्लक्ष होत असून या तालुक्यात कोणतेच कार्यक्रम, अथवा जनसंपर्क दौरे दिसत नसल्यामुळे मतदारांमध्ये गप्पा रंगताना दिसत आहे, त्या भावी आमदारांना बार्शिटाकळी तालुक्याचा आतापासूनच विसर पडत तर नाही ना! अशी चर्चा देखील होताना दिसत आहे मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघात उतरलेल्या काही भावी आमदारांचे कार्यक्रम स्थानिक मूर्तीजापुर शहरात जास्त साजरे होत असून त्या ठिकाणी कधी आंदोलन तर कधी मोर्चे असे जनहिताचे काम केले जात आहे, परंतु मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये बार्शी टाकळी तालुक्याचा समावेश असताना सुद्धा काही भावी आमदारांचा जनसंपर्क कमी असल्याचे निर्देशनाशी येत आह...