आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर सराईत गुंडांकडून प्राणघातक हल्ला,

आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर सराईत गुंडांकडून प्राणघातक हल्ला, 
विशेष प्रतिनिधी 
अकोला : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वीराज देशमुख याच्यावर काही सराईत गुंडांनी अकोल्यात हल्ला केलाय. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पृथ्वीराज देशमुख हा स्वाद बेकरीसमोरच्या कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. या हल्ल्यादरम्यान पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण करण्यात आलीये.


ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात दाखल 

आमदाराच्या मुलावर हल्ल्याची झाल्याची माहिती मिळतात ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्व जण कृषीनगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलिस ठाण्यात पोचले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.दरम्यान, 30 मिनिट पोलिसांचं कुणीही आलं नव्हतं, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढतायात. पोलीस ठाण्यात हजर राहत नाहीत, आज माझ्या मुलावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने पळ काढल्याने पुढील अनर्थ टळलाये, असं आमदार नितीन देशमुख म्हणाले आहेत. 

पोलिसांनी कारवाई केली नाही, तर गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल

नितीन देशमुख म्हणाले, मी वारंवार एसपी साहेबांना विनंती केली, शहरात गुन्हेगारी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी 15 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या झाली होती. आज तशाच पद्धतीने माझा मुलगा तिथे दुकानाजवळ उभा होता. अचानक माझ्या मुलाच्या अंगावर प्राणघातक हल्ला केला. एकजण चाकू घेऊन आला होता, तर एका जणाने फरशी डोक्यात मारण्याचा प्रयत्न केलाय. माझा मुलगा आणि त्याचा मित्र दोघांनी पळ काढला. दुकानात लपले. नाहीतर आज सुद्धा अनर्थ घडला असता. वारंवार या भागात गुन्हेगारी कृत्य घडत आहेत. या भागात लहान मुलांचं आणि मुलींचं फिरणं मुश्किल झालं आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही एसपी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. आज पोलीस स्टेशनला आलो तर तीनच पोलीस हजर होते. एवढे मोठे पोलीस ठाणे आहे, अर्धा तास कोणीच नव्हतं. विनंतीनुसार काय कारवाई करतात हे पाहू. पण आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....