वडीलांसह पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह पिंजर येथील आपत्कालीन पथकाने काढले शोधून..

वडीलांसह पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह पिंजर येथील आपत्कालीन पथकाने काढले शोधून..
मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाची दमदार कामगीरी पथकाचे सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे 

बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
▶️बुलढाणा जिल्ह्य़ातील देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव चिलमखा येथील,दीपक प्रल्हाद निकाळजे वय (29) वर्ष हे आपला मुलगा अर्थव दीपक निकाळजे वय 5 वर्ष याला घेऊन जवड खेड येथील नाल्यावरुन मोटारसायकल ने जात असताना ते मोटारसायकल सह 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी दोघे बाप लेक वाहून गेले होते थोड्याच अंतरावर नाल्यात त्यांची दुचाकी मिळुन आली तेव्हापासून शोध मोहीम चालु केली असता दोन दीवस उलटुन गेले परंतु काहीच मिळुन आले नाही शेवटी सिंदखेड राजा उप विभागीय अधिकारी संजय खडसे सर यांनी 27 सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्य़ातील पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण करण्यात आले रात्रीच जिवरक्षक दिपक सदाफळे यांचेसह त्यांचे सहकारी मयुर सळेदार,शेखर केवट, धिरज राऊत,निलेश खंडारे, मयुर कळसकार,महेश वानखडे,अश्विन केवट, निखील बोबडे,यांचेसह रेस्क्युबोट शोध व बचाव साहित्यासह 28 सप्टेंबर रोजी सकाळीच 5:00 वाजता घटनास्थळावर पोहचले असता उ.वि.अ. संजय खडसे सर यांचे आदेशाने तसेच तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांचे सोबत सर्च ऑपरेशन चालु केले घटनास्थळावरून जवड खेड नाला ते आमना नदीत 12 की.मी.पर्यंत पायी चालत शोध मोहीम राबवित असताना दुपारी दीड वाजता चींचोली गुरुकुल येथील आमना नदीत अथर्व याचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले बाहेर काढून दीला नंतर तेथुनच पुढे दोन की.मी.अंतरावर गोंधनखेड येथील आमना नदीत सापडला यावेळी पुर्ण दीवस भर सोबत असलेले सिंदखेड राजा उ.वि.अ. संजय खडसे सर, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ मॅडम, ना.त. संतोष मुंडे सर, मं.अ. रामदास मान्टे, मं.अ. एन,एल,वायडे, तलाठी एस एम चिकटे, तलाठी जे एस लोखंडे, तलाठी विलास नागरे,तलाठी पि,टी, जायभाये कोतवाल विठ्ठल हरणे, कोतवाल जगन बुरकुल,कोतवाल सज्जन शेळके,कोतवाल पि,आर, देढे, देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष महल्ले सर,हे.काॅ. काकडे,हे.काॅ.विश्वनाथ काकड,पोकाॅ चंदु साळवे, पो.काॅ. अभी ठाकरे,पो.काॅ. नंदकिशोर ईघारे, आणी बुलाढाणा पोलीस टीम सहभागी झाली होती हे आणी नातेवाईक सोबत होते अशी माहीती मंडळ अधिकारी मान्टे यांनी दीली आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे