मूर्तिजापूर मतदारसंघाच्या विकासासाठी सुगत वाघमारे यांना विजयी करा ! सुनील धाबेकर : बार्शिटाकळी येथील प्रचार सभेत आवाहन...
मूर्तिजापूर मतदारसंघाच्या विकासासाठी सुगत वाघमारे यांना विजयी करा ! सुनील धाबेकर : बार्शिटाकळी येथील प्रचार सभेत आवाहन बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मूर्तिजापूर मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुगत वाघमारे यांना भरघोस मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुनील धाबेकर यांनी रविवारी केले. मूर्तिजापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. सुगत वाघमारे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील बार्शिटाकळी येथील आठवडी बाजारात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. मूर्तिजापूर मतदारसंघाचा अद्यापही पाहिजे तसा विकास झाला नाही, असा आरोप करीत या मतदारसंघातील रखडलेली विकासकामे आणि विविध प्रकल्प मार्गी लावण्याकरिता आणि मूर्तिजापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता डॉ. सुगत वाघमारे यांना भक्कम मतांनी विजयी करून आमदार म्हणून विधानसभेत पाठविण्याचे आवाहन सुनील धाबेकर यांनी केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मूर्तिजापूर मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुग...