मूर्तिजापूर मतदारसंघाच्या विकासासाठी सुगत वाघमारे यांना विजयी करा ! सुनील धाबेकर : बार्शिटाकळी येथील प्रचार सभेत आवाहन...

मूर्तिजापूर मतदारसंघाच्या विकासासाठी सुगत वाघमारे यांना विजयी करा !
सुनील धाबेकर : बार्शिटाकळी येथील प्रचार सभेत आवाहन
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मूर्तिजापूर मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुगत वाघमारे यांना भरघोस मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुनील धाबेकर यांनी रविवारी केले.
मूर्तिजापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. सुगत वाघमारे यांच्या प्रचारार्थ
मतदारसंघातील बार्शिटाकळी येथील आठवडी बाजारात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. मूर्तिजापूर मतदारसंघाचा अद्यापही पाहिजे तसा विकास झाला नाही, असा आरोप करीत या मतदारसंघातील रखडलेली विकासकामे आणि विविध प्रकल्प मार्गी लावण्याकरिता आणि मूर्तिजापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता डॉ. सुगत वाघमारे यांना भक्कम मतांनी विजयी करून आमदार म्हणून विधानसभेत
पाठविण्याचे आवाहन सुनील धाबेकर यांनी केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मूर्तिजापूर मतदारसंघातील उमेदवार डॉ. सुगत वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे , विजय पहुरकर, सतिष पवार, दामु पाटील, प्रभाताई सिरसाठ, प्रतिभा ताई अवचार, मराठा महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा ठाकरे , कविता राठोड, वैशाली कांबळे, गडलीग ताई, अशोक कोहर, विजय चव्हाण, शेख नइमोद्दीन, रागीब हाजी साहेब, जमीर मिस्त्री, निक्की डोंगरे, गोरशिग राठोड, गोबा शेठ, माजी नगरसेवक श्रावण भातखडे, सुनील सिरसाठ, सुरेश जामनिक, अनिल धुरंदर, नशिम खान, अझहर पठाण, ईमरान खान, अनिल चव्हाण, सुरेंद्र सोळंके, दिनकरराव पातोड, रामदास गाडगे, दिनेश मानकर, रोहीदास राठोड, यांच्यासह पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या प्रचार सभेला वंचित बहुजन आघाडीचे मूर्तिजापूर आणि बार्शिटाकळी शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक व महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद करवते तर आभार प्रदर्शन दादाराव सुरडकर यांनी केले 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे