पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

👉पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज!
👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ...
प्रतिनिधी श्रावण भातखडे 
अकोला :- पाटील समाज वर-वधू सूचक केंद्र द्वारा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या मेळाव्याच्या नियोजनासाठी रविवार दि. 1 डिसेंबर रोजी मोठी उमरीत शोभा मंगलम सभागृहात पाटील समाजाची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना मराठा योद्धा गजानन हरणे यांनी पाटील समाजाने काळानुसार बदलले पाहिजे पाटील समाजातील अंधश्रद्धा ,वाईट चालीरीती याला तिलाजली देऊन कमी खर्चाचे लग्न सोहळे पार पाडण्याकरता पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रामेश्वर घोरमाडे हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये मराठायोद्धा गजानन हरणे, डॉ. अशोक कोळंबे, विठ्ठल माळी, राजेश ठाकरे, दिलीप पाटील, गणेश भटकर, चंद्रकांत ताठे, संतोष गोळे, वसंत माळी, नंदकिशोर गावंडे, संतोष आखरे, प्रमोद चौधरी, नामदेव वक्टे, सुभाष पागृत आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.यावेळी
        येत्या जानेवारी महिन्यामध्ये पाटील समाज वर-वधू सुचक केंद्र द्वारा समाजातील उपवर-वधूंच्या परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी सर्वतोपरी तयारी केली जात आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरून पाटील समाजातील जास्तीत जास्त उपवर-वधू व पालकांनी सहभागी व्हावे यासाठी या मेळाव्याचा प्रचार व प्रसार केला जात आहे. तसेच मेळावा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी व्हावा, या मेळाव्याच्या माध्यमातून उपवर-वधूंना योग्य जोडीदार मिळून उपवर-वधूंची सोयरीक जुळावी तसेच गरीब पालकांच्या मुलींचे विवाह आदर्श पद्धतीने व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या सर्व नियोजनासाठी मंडळाद्वारा दिनांक १ डिसेंबर रविवार रोजी मोठी उमरी येथील शोभा मंगलम येथे बैठक पार पडली. या बैठकीत परिचय मेळाव्याच्या नियोजनाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालक वसंत माळी तर आभार नंदकिशोर गावंडे यांनी केले . कार्यक्रमाला पाटील समाज मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे