समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : संघटन मजबूत करायचे असेल तर कार्यकर्त्याचे चारित्र्य शुद्ध असावे, जीवन निष्कलंक असावे, जीवनात त्याग असावा, अपमान सहन करण्याची ताकद असावी, आचार विचार शुद्ध असावे तर कार्यकर्त्यांच्या शब्दाला वजन येते आणि लोक आपले ऐकतात. सरकार कोणाचेही असो नाक दाबले तर तोंड उघडले पाहिजे असे मजबूत संघटन निर्माण करण्यासाठी समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज असल्याचे मत खडकी अकोला येथे आयोजित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या जिल्हा बैठकीला मार्गदर्शन करताना समाजसेवक तथा जिल्हाध्यक्ष गजानन हरणे यांनी व्यक्त केले.जन आंदोलनामुळे देशाला आणि राज्याला माहितीचा अधिकार, ग्रामसभेला जादा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, ग्रामरक्षक दल, दारूबंदी,जन लोकपाल कायदा, यांसारखे दहा कायदे जनतेला मिळाले.राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाच्या जिल्हा संघटक बांधणीच्या बैठकीसाठी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष गजानन हरणे, जयदीप सोनखास्कर, सुरेश खाडे, विलास तायडे, विकास रामटेके, राजकुमार चांदूरकर, फुलचंद वानखडे, विलास हिवराळे, मुरलीधर तराळे, रवींद्र गेडाम, सुरज मेनकार , विनायक वसतकार , रेखा गेडाम, एकनाथ आंधळे, मधुकर महल्ले, भिकाजी कडू, राजेश आंधळे, आदी न्यासाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा बैठक पार पडली.यावेळी संघटन बांधणीबाबत विस्ताराने चर्चा करण्यात आली, आलेल्या प्रत्येक प्रमुख कार्यकर्त्यांनी आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली. बैठकीमध्ये जिल्हास्तरावरील,तालुकास्तरी शहरस्तरीय आणि ग्राम शाखा समित्यांबाबत चर्चा होऊन तालुकाअध्यक्ष पद निवडीबाबत सूचना मांडली. सदर बैठकीअंती असा ठराव करण्यात आला की, तालुका व शहर अध्यक्ष म्हणून कार्यकर्त्यांना निवड करून त्यांना नियुक्तीचे पत्र राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या शुभहस्ते देण्यात यावे हा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषद ,पंचायत समिती सर्कल अध्यक्षांची निवड करून ग्राम शाखा स्थापन करण्याकरता निवड झालेल्या जिल्ह्यातील तालुका पदाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालक कृष्णा वक्टे तर आभार प्रदर्शन नंदकिशोर गावंडे यांनी केले .या जिल्हा बैठकीला सातही तालुक्यातील कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......