अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर
अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल यांचा संघटनेच्या वतीने सत्कार._
अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी अकोला डॉक्टर बळीराम गाढवे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय अकोला येथे सत्कार करण्यात आला
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील निर्देशांकावर आधारित ऑक्टोंबर महिन्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकाच्या संवर्गाच्या रँकिंगची घोषणा 10 ऑक्टोबरला राज्यातील आरोग्य विभागा तर्फे घोषणा करण्यात आली. यात जिल्हा आरोग्य अधिकारी रँकिंग मध्ये ग्रामीण भागातील कामगिरीत अकोला जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी केलेल्या आरोग्य विषयक कामगिरीमुळे. अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाची मान अजून उंचावलेली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला या संघटनेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तालुकास्तरीय ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात माता व उपकेंद्रात बालकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा, लसीकरण, कुटुंब नियोजन कार्यक्रम, सात रोग प्रतिबंधक उपाय योजना, महिलांची प्रस्तुती, हृदयरोग, उच्च रक्त दाब, मधुमेह, रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, कुपोषित बालकांसाठी
पोषण पुनर्वसन केंद्र, क्रिटिकल रुग्णांसाठी आयसीयू, शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक व सुसज्ज शस्त्रक्रिया गृह, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सेवा मध्ये केलेली कामगिरी कौतुकास्पद व सर्वोत्कृष्ट असल्याबद्दलचा शेरा या आरोग्य विभागाने दिला ऑक्टोंबर महिन्याचा रँकिंगचा अहवाल दहा डिसेंबर रोजी जाहीर झाला. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी या संवर्गा च्या रँकिंग मध्ये अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे राज्यात प्रथम आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्या नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना अकोला यांच्या वतीने त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष संगीता ताई जाधव, जिल्हा सरचिटणीस संजय दाबेराव, जिल्हा सचिव राम रतन मे टांगे, जिल्हा सल्लागार वृंदा विजयकर, बाळापुर तालुका अध्यक्ष प्रियांका अंभोरे, अकोला तालुका अध्यक्ष अनिता घुले, बाळापुर तालुका उपाध्यक्ष अर्चना गवई, जिल्हा सल्लागार धम्मपाल खंडारे, जिल्हा मार्गदर्शक सुरेखाताई गीते, जिल्हा सदस्य मंगला इंगळे, जिल्हा सदस्य,मुक्ता कोलटक्के, जिल्हा सदस्य मनीषा बुंदे,
Comments
Post a Comment