Posts

Showing posts from January, 2025

ग्रामीण रुग्णालय येथे लेप्रोस्कोपी शिबिरात १९ शस्त्रक्रिया सफल...

Image
ग्रामीण रुग्णालय येथे लेप्रोस्कोपी शिबिरात १९ शस्त्रक्रिया सफल... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : स्थानिक ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे कुटुंब कल्याण कॅम्प किंवा शिबिर घेण्यात आले. सदर शिबिरात लेप्रोस्कोपी द्वारे १९ शस्त्रक्रिया करण्यात आले असून यावेळी डॉ सिरसाम, डॉ कडसकर, डॉ वैद्य मेडस, यांनी शस्त्र किरिया केले असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ वानखेडे मेडम डॉ आर्य यांनी सहकार्य केले. सदर शिबिर यशस्वितेसाठी ग्रामीण स्णालयाची डॉ वाप मॅडम, डॉ वैद्य मॅडम, सोनवणे मॅडम गाडेकर मॅडम आठवले मॅडम, मंगला तितुर मॅडम, पुगे मॅडम, भगत मॅडम डुकरे मॅडम राहणे मेडम, अशोक राठोड, डॉ राम बायस्कर, डॉ गुक्रान खान, बालाजी गव्हाणे, अनिल ठाकरे, वॉर्ड बॉय पुरंदर संजू निदाने, कान्हेरी सरप येथील मोहले साहेब पूर्व ल साहेब शेळके साहेब ठाकूर साहेब, आसरा भगत आदी यावेळी परिश्रम घेतले.

ग्रामीण रुग्णालय येथे महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी...

Image
ग्रामीण रुग्णालय येथे महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी... बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी :  तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बार्शिटाकळी  येथे  राष्ट्रपिता  महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त यांच्या फोटो ला हार अर्पण करून डॉ  बळीराम गाढवे ( जिल्हा आरोग्य अधिकारी) व डॉ  डी. टी. रणमले  ( सहाय्यक सांच्यालक आरोग्य सेवा (कुष्टरोग ) अकोला व डॉ रवींद्र आर्य (तालुका आरोग्य अधिकारी) कार्यालंय बार्शीटाकळी  व नरेंद्र बेलूरकर साहेब (  जिल्हा कुष्टरोग पर्यवेक्षक) यांच्या हस्ते पूजन करण्यात आले  असून स्पर्श  कुष्टरोग जनजागृती अभियाला 2025 शुभारंभ करण्यात आला .दिनांक 30 जानेवारी 2025 ते 13 फेब्रुवरी 2025 दरम्यान तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम आरोग्य सेवक व सेविका व आशा मार्फत राबविणार आहेत. या कार्यक्रमाला शरद ठाकूर (आरोग्य सहाय्यक)  मंगेश रुदरकर (कुष्टरोग  तंत्रज्ञ ) अमोल पाचडे (क्षयरोग पर्यवेक्षक ) विनोद कळबे (शिकलसेल सहाय्यक ) राम बायस्कर (आरोग्य सेवक ) धनंजय पालेकर, अमोल घोळे ,सुधाकर चतरकर , बाल...

न.प. च्या कारवाईने व्यावसायिक अडचणीत! ■ जागा खाली करण्याच्या व्यावसायिकांना नोटीस. ■ ग्रामपंचायतने करारनामा करून दिल्या होत्या जागा

Image
न.प. च्या कारवाईने व्यावसायिक अडचणीत! ■ जागा खाली करण्याच्या व्यावसायिकांना नोटीस ■ ग्रामपंचायतने करारनामा करून दिल्या होत्या जागा बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळीः येथील नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी वापरात असलेल्या जागा खाली करण्याच्या नोटीसा दिल्यानंतर व्यावसायिकांनी सदर जागा खाली केल्यात. परंतु सद्यस्थितीला त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. बार्शिटाकळी नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत असताना करारनाम्यानुसार अनेक जागा व्यावसायिकांना दिल्या होत्या. सदर जागा आठवडी बाजार व विकास कामाकरिताखाली करण्यात याव्यात, अशा प्रकारचे आदेश २६ डिसेंबरला बार्शिटाकळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी दिले होते. त्यांच्या आदेशानुसार बार्शिटाकळी शहरातील काही लघु व्यावसायिकांनी जागा खाली केलेल्या आहेत; परंतु सद्यस्थितीला त्यांना आपले व्यवसाय करण्याकरिता विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. कुटुंबांचा उदरनिर्वाह चालविण्याकरिता विविध प्रकारच्या समस्या व अडचणी त्यांच्यासमोर उभ्या असून, त...

🌀अमृतसर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन अकोला जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन 🌀अकोला जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर....

🌀अमृतसर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी वंचित बहुजन अकोला जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन  🌀अकोला जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर  बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे  बार्शिटाकळी : अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडी च्या सर्व शाखेकडून आज अमृतसर पंजाब येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून तपास करून चौकशी करून आरोपीला हे कृत्य करावयास लावणाऱ्या मास्टर माईंड चा शोध घ्यावा व आरोपी आणि मास्टर माईंड यांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस दाखल करून फास्टट्रॅक कोर्टा मार्फत तात्काळ शिक्षा करावी या मागणी करिता वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा च्या वतीने जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करून अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यामार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले  यावेळी वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव राजेंद्र पातोडे, श्रीकांत घोगरे आम्रपाली ताई खंडारे, मजहर खान, गजानन गवई, सुनील फाटकर, निलोफर शहा, अशोक दारोका...