न.प. च्या कारवाईने व्यावसायिक अडचणीत! ■ जागा खाली करण्याच्या व्यावसायिकांना नोटीस. ■ ग्रामपंचायतने करारनामा करून दिल्या होत्या जागा

न.प. च्या कारवाईने व्यावसायिक अडचणीत!
■ जागा खाली करण्याच्या व्यावसायिकांना नोटीस
■ ग्रामपंचायतने करारनामा करून दिल्या होत्या जागा
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळीः येथील नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी वापरात असलेल्या जागा खाली करण्याच्या नोटीसा दिल्यानंतर व्यावसायिकांनी सदर जागा खाली केल्यात. परंतु सद्यस्थितीला त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

बार्शिटाकळी नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत असताना करारनाम्यानुसार अनेक जागा व्यावसायिकांना दिल्या होत्या. सदर जागा आठवडी बाजार व विकास कामाकरिताखाली करण्यात याव्यात, अशा प्रकारचे आदेश २६ डिसेंबरला बार्शिटाकळी नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी दिले होते. त्यांच्या आदेशानुसार बार्शिटाकळी शहरातील काही लघु व्यावसायिकांनी जागा खाली केलेल्या आहेत; परंतु सद्यस्थितीला त्यांना आपले व्यवसाय करण्याकरिता विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. कुटुंबांचा उदरनिर्वाह चालविण्याकरिता विविध प्रकारच्या समस्या व अडचणी त्यांच्यासमोर उभ्या असून, ते चिंतेत सापडले आहेत. यातून काही मार्ग काढून अशा व्यक्तींना पर्याय स्वरूपाच्च्या जागा उपलब्ध करून दिल्यास त्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आमच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडविण्यासाठी नगरपंचायतने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही या व्यावसायिकांकडून होत आहे.

पाल मांडून करावा लागतो व्यवसाय

कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी मोठ्या कष्टाने व्यवसाय उभारला होता. कसेतरी दोन घास कुटुंब आनंदाने खात असतानाच अचानक दुकाने खाली करण्याच्या नोटीसा आल्याने सध्या आमच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूलाच पाल मांडून व्यवसाय करण्याची पाळी आमच्यावर आली आहे. यातून पर्यायी मार्ग नगर पंचायतने काढावा, जेणेकरून आमचा व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरळीत चालू शकेल, अशा भावनाही या व्यावसायिकांनी बोलून दाखविल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे