बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,
बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश....
👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी :- आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यमान समता परिषदेचे शहराध्यक्ष चक्रधर राऊत यांच्या सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश बार्शिटाकळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.गटाचे ) माजी शहराध्यक्ष तथा विद्यमान समता परिषदेचे शहराध्यक्ष श्री चक्रधर राऊत यांच्या सह मो. जफर (माजी सदस्य ग्रा. पं.), अब्दुल सईद,जफरऊलाखान,
शेख अमीन , सैय्यद बहार, आशीक खान, नईमोदीन इंजीनिअर, सैय्यद अनीस या युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन यांच्या निवासस्थानी पार पडला
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद देंडवे, अकोला पुर्व चे तालुकाध्यक्ष किशोर जामनिक, बार्शिटाकळी तालुका कार्याध्यक्ष गोरशिग राठोड, शहराध्यक्ष अजहर पठाण, गोबा शेठ,रागिब हाजी साहेब, माजी गटनेते सुनिल शिरसाठ ,माजी नगरसेवक सुरेश जामनिक, माजी नगरसेवक श्रावण भातखडे, इमरान खान, अनिल धुरंधर, जमीर मिस्त्री, सै रियासत, दादाराव जामनिक, सै अन्सार, अमोल जामनिक, सैय्यद अबरार, अमित तायडे, शुभम इंगळे, रक्षक जाधव, सचिन आगाशे, संकेत सपकाळ, महेंद्र नवघरे, राजु धुरंधर, उज्वल खाडे, राजकुमार खाडे, मुकेश सुरवाडे, शेख इब्राहिम, यांच्या सह बार्शिटाकळी नगरपंचायत निवडणूक मधील वंचित बहुजन आघाडी कडुन इच्छुक उमेदवार उपस्थित होते तसेच बार्शिटाकळी शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शिरसाठ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुनिल जाधव यांनी केले.
Comments
Post a Comment