बार्शिटाकळी पोलिसांनी आवळल्या गोवंश चोरट्यांच्या मुसक्या ! 👉गोवंशासह २ लाख ६७हजारांचा मुद्देमाल जप्त.... 👉गुन्ह्यात मुख्य आरोपीसह इतर तीन जण निष्पन्न...
बार्शिटाकळी पोलिसांनी आवळल्या गोवंश चोरट्यांच्या मुसक्या ! 👉गोवंशासह २ लाख ६७हजारांचा मुद्देमाल जप्त 👉गुन्ह्यात मुख्य आरोपीसह इतर तीन जण निष्पन्न बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे बार्शिटाकळी : येथील पोलिस स्टेशन हद्दीतील गोवंश चोरीप्रकरणी चोरट्याचा शोध घेऊन त्याची कसून चौकशी केली असता ही जनावराने कोणाला विकली याची माहिती घेतली. सदर ठिकाणी छापा टाकून गोवंशासह २ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मुख्य आरोपीसह इतर तीन आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत. जयचंद रमेश जाधव (३०) रा. काजळेश्वर यांच्या मालकीच्या दोन गायी अंदाजे किंमत २९ हजार रूपये चोरीस गेल्याची तक्रार दिल्यावरून बार्शिटाकळी पोलिस स्टेशनमध्ये बीएनएस कलम ३०३ (२) अन्वये २५ मे रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्यातील चोरीस गेलेले जनावरे व अज्ञात आरोपींचा शोध घेणे कामी ठाणेदार दीपक वारे यांनी तत्काळ एक शोध पथक तयार केले. या पथकाने गोपनीय माहिती काढून ही जनावरे तिवसा येथील महादेव गजानन कळम याने चोरल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यास तत्काळ ताब्यात घेऊन कसून विचारपुस के...