बार्शिटाकळी पोलिसांनी आवळल्या गोवंश चोरट्यांच्या मुसक्या ! 👉गोवंशासह २ लाख ६७हजारांचा मुद्देमाल जप्त.... 👉गुन्ह्यात मुख्य आरोपीसह इतर तीन जण निष्पन्न...

बार्शिटाकळी पोलिसांनी आवळल्या गोवंश चोरट्यांच्या मुसक्या !
👉गोवंशासह २ लाख ६७हजारांचा मुद्देमाल जप्त
👉गुन्ह्यात मुख्य आरोपीसह इतर तीन जण निष्पन्न
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी श्रावण भातखडे 
बार्शिटाकळी : येथील पोलिस स्टेशन हद्दीतील गोवंश चोरीप्रकरणी चोरट्याचा शोध घेऊन त्याची कसून चौकशी केली असता ही जनावराने कोणाला विकली याची माहिती घेतली. सदर ठिकाणी छापा टाकून गोवंशासह २ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मुख्य आरोपीसह इतर तीन आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत.
जयचंद रमेश जाधव (३०) रा. काजळेश्वर यांच्या मालकीच्या दोन गायी अंदाजे किंमत २९ हजार रूपये चोरीस गेल्याची तक्रार दिल्यावरून बार्शिटाकळी पोलिस स्टेशनमध्ये बीएनएस कलम ३०३ (२) अन्वये २५ मे रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्यातील चोरीस गेलेले जनावरे व अज्ञात आरोपींचा शोध घेणे कामी ठाणेदार दीपक वारे यांनी तत्काळ एक शोध पथक तयार केले. या पथकाने गोपनीय माहिती काढून ही जनावरे तिवसा येथील महादेव गजानन कळम याने चोरल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यास तत्काळ ताब्यात घेऊन कसून विचारपुस केली असता ही जनावरे बार्शिटाकळी येथील इरशाद उल्ला खा उर्फ गुड्डु यास विक्री केल्याचे सांगितले. त्यावरून इरशाद उल्ला खा उर्फ गुड्डूयास शिताफीने ताब्यात घेऊन कोणताही वाद निर्माण न करता त्याकडून सदर गुन्ह्यातील १७ हजार रु. किमतीची एक पांढऱ्या रंगाची फिर्यादीच्या मालकीची असलेली गाय त्याचे राहते घरातून ताब्यात घेतली. तसेच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेले २ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन एमएच ३० बीडी ६७४६, असा २ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयात इतर ३ आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास पोहवा शेगोकर करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दीपक वारे, एएसआय फराज शेख, पोहवा विजय शेगोकर, नागसेन वानखडे, राजू जौधरकर, पाशि मनीष घुगे, ईश्वर पातोंड, संतोष दाभाडे यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे