अंकुश शेवलकर याने अथक प्रयत्न करून दहावीत मिळविले 95 टक्के गुण
अंकुश शेवलकर याने अथक प्रयत्न करून दहावीत मिळविले 95 टक्के गुण
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकली : माळीपुरा येथील विनोद शेवलकर यांचा मुलगा अंकुश शेवलकर याने अथक प्रयत्न करून दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळविले आहे त्याने अकोला येथील जे आर डी टाटा स्कूल अकोला येथून आपली दहावि ची परीक्षा उत्तीण केली आहे अंकुश शेवलकर यांचे वडील विनोद शेवलकर यांचा बार्शिटाकळी येथे पानपट्टीचा व्यवसाय असून त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याच ठरवलं आहे आणि मुलांने सुद्धा दहावीच्या परीक्षेचा अथक प्रयत्न करून 95 टक्के गुण घेऊन तसेच सर्व विषयांमध्ये 90% पेक्षा जास्त गुण घेऊन आपल्या वडिलांच्या मेहनतला साथ दिली आहे लहानपणापासूनच अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला अंकुश हा वैद्यकिय क्षेत्रात जाऊन रुग्ण सेवा करणार असल्याचे त्यांने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले अंकुश ला दहावीच्या परीक्षेत भरघोस यश मिळाल्याबद्दल सर्वत्र त्याची प्रशंसा होत आहे
Comments
Post a Comment