नवसाच्या नावाखाली महिलेवर अत्याचार.,.....आरोपींना अटक.,....
नवसाच्या नावाखाली महिलेवर अत्याचार.,.....
आरोपींना अटक.,....
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २२ वर्षीय विवाहित महिलेला मूलबाळ होत नसल्याने फूस पळवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका २२ वर्षीय विवाहित महिलेने फिर्यादीत दिलेल्या बयानात इंस्टाग्रामवर दोन महिन्यापूर्वी ज्योती नागेश हिवराळे (२३) रा. बोथा काजी तालुका खामगाव यांच्याशी ओळख झाली. सदर फिर्यादी महिलेस मूलबाळहोत नसल्याने आसरा संस्थान दोनद
येथे नवसाच्या नावाखाली फूस लावून चार चाकी वाहनातून सुरेश महादेव पाचपोर (२३) रा. दाथुलगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा व नागेश हिवराळे (२३) रा. बोधाकाजी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांनी नेले. सदर फिर्यादी महिला गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर आरोपी त्यांनी सदर महिलेला पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील एका लॉजवर घेऊन गेले तेथून नागेश हिवराळे व ज्योती नागेश हिवराळे तेथून निघून आले. यातील सुरेश महादेव पाचपोर याने गुंगीचे औषध देऊन सतत तीन दिवस फिर्यादी महिलेशी शारीरिक संबंध ठेवले, अशा तक्रारीनुसार आरोपी सुरेश महादेव पाचपोर, ज्योती नागेश हिवराळे व नागेश हिवराळे यांचेवर कलम ६३, १२३, १३८, १४२, ३(५) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, असून सदर घटना ५ मे ते ९ मे याकालावधीत घडली. याबाबत १३ मेला सदर फिर्यादी महिलेची बार्शिटाकळी पोलिसात जबानी फिर्याद दाखल झाल्यानंतर ठाणेदार दिपक वारे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वेगाने सूत्रे हलवून हे. कॉ. नागसेन वानखडे, मनीष घुगे, ईश्वर पातोड यांना चौकशी करिता नेमून आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपीला सहा तासातच अटक करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले.
बार्शिटाकळीच्या धाबेकर विद्यालयाचा उल्लेखनीय निकाल
बार्शिटाकळीः नुकताच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकालात बार्शीटाकळी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ९६.६४ टक्के निकाल लागला आहे. विद्यालयातील शिक्षक वृंदानी केलेल्या मेहनतीचे सार्थक झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. याविद्यालयातून परीक्षेला बसलेल्या ३२८ विद्यार्थ्यांपैकी ३१७ यशस्वीरित्या उत्तीर्ण विद्यालयाचा निकाल ९६.६४ टक्के झाले, परिणामी त्यांचा यशाचा दर ९६.६४ टक्के इतका आहे. मराठी माध्यमातून अनिरुद्ध प्रमोद गोल्डे हा ८९.६० टक्के गुणांसह अव्वल ठरला. भूषण दशरथ ढोरे हा ८७.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक व तन्वी रामराव ढोरे आणि साक्षी अमोल नेमाने या दोघांनी ८७.००टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. तर उर्दू माध्यमातून आसिया सदफ साजिद अनवर खान ९०.४० टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले तर आमीर खान गजनफर उल्लाह खान ८९.२० टक्के मिळवून दुसरा क्रमांक पटकावला तसेच मो. उजेफ मो. नाजीर याने ८८.६० टक्के मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. हे उल्लेखनीय निकाल बाबासाहेब धाबेकर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारी या दोघांनी घेतलेली मेहनत व योग्य मार्गदर्शन याचे उत्तम उदाहरण आहे.
बार्शिटाकळीच्या तहसीलदारांना दिले शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती, बँक कर्ज भरणा वापसी अर्ज
बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे
बार्शिटाकळी : बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना कर्जमुक्ती व बँक कर्ज भरणा वापसीचे अर्ज १४ मे रोजी सादर केले आहे. राज्यातील शेतकरी मानवनिर्मित व नैसर्गिक संकटामुळे कमालीचा हैराण झाला असून राष्ट्रीयकृत बँका व पतसंस्थेकडून काढलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नसल्याने मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहते. शेतकऱ्यांच्या हिताकरिता किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचे मार्गदर्शनात किसान ब्रिगेडच्या वतीने राज्यभर सदर अभियान चालू असून बुधवारी बार्शिटाकळीचे तहसीलदार राजेश वझिरे यांच्याकडे किसान ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष स्वप्निल पाटील मिरगे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या समस्या संदर्भात बार्शीटाकळीचे तहसीलदार श्री राजेश वझीरे यांच्यासोबत चर्चा करून तहसील कार्यालयात सदर अर्ज सादर केले.
Comments
Post a Comment