बार्शिटाकळी तालुक्यातील पाटखेडला उन्हाळी मुगाच्या शेतात गांजाची लागवड

*बार्शिटाकळी तालुक्यातील पाटखेडला उन्हाळी मुगाच्या शेतात गांजाची लागवड* 
405 झाडे 65 किलो गांजासह 1 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त
एका शेतकऱ्याने उन्हाळी मुगाच्या शेतात गांजाची लागवड केली.स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी 65 किलो गांजासह 1 लाख 88 हजारांचा रुपयांचा मुद्देमाल जप्त केले.या शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
  आर्थिक फायद्यासाठी जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यातील पाटखेड येथे एका शेतकऱ्याने उन्हाळी मुगाच्या शेतात गांजा लावला होता गाजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असुनही या शेतकऱ्याने अवैध पध्दतीने गांजाची शेती केली.याची गोपनीय माहिती अकोला पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला समजली.नतर पोलीसांनी येथील ठिकाणी छापा टाकला असता, या शेतकऱ्यांकडून तब्बल 65 किलो गांजा पकडला.सोबतच गांजाची 405 झाडे ताब्यात घेऊन 2 लाखाच्या रुपयांच्या जवळपास मुद्देमाल जप्त केला आहे.पैशाच्या हव्यासापोटी गांजा लागवड करणार्या सचिन रमेश महाजन रा.पाटखेड,ता.बार्शिटाकळी , या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर ,अप्पर पोलीस अधिक्षक मोनीका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले,पोलिस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख,नायब तहसीलदार आर.डाबेराव ,ए एस आय ठाकुर, गणेश पांडे, दत्तात्रय ढोरे, गोकुळ चव्हाण,रवी पालीवाल, श्रीकांत पातोड,संदिप ताले महिला पोलिस कॉन्स्टेबल अनिता टेकाम. यांनी केली आहे. 

*कारवाया होत आहेत म्हणून घटना उघडकीस येताहेत की पोलीसांचा धाक नाही?* 
गेल्या वर्षभरात पासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गांजा जप्तीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत.त्यापूर्वी क्वचितच अशा कारवाया व्हायच्या.मात्र आता कारवायांचा सपाटा सुरू आहे म्हणून घटना उघडकीस येताहेत की, पोलीसांचा धाक नाही, त्यामुळे थेट अशा पध्दतीने गांजाची शेती सर्रास जप्त कली जात आहे असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे.काही का असेना मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या समांतर विशेष पथक असतांनाही मोठ्या पध्दतीने अवैध धंदे सुरू कसे असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होते आहेत 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे