उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय बार्शिटाकळीचा गलथान कारभार प्रभाग क्रमांक 2 व 3 मधील नमुना 8 अ (अतिक्रमण ) धारक घरकुला पासुन वंचितच
उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय बार्शिटाकळीचा गलथान कारभार प्रभाग क्रमांक 2 व 3 मधील नमुना 8 अ (अतिक्रमण ) धारक घरकुला पासुन वंचितच
बार्शिटाकळी येथील प्रभाग क्रमांक 2 व 3 मधील (नमुना 8 आ) अतिक्रमण धारकांनी प्रधानमंत्री घरकुल आवास योजने मध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी अर्ज दाखल केले होते. त्याकरिता नगरपंचायत कार्यालय बार्शिटाकळी ने त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून (नमुना 8 अ)अतिक्रमण धारकांची आखिव पत्रीका ( मोजणी शिट) तयार करण्यासाठी मोजणी फी भरूनही तीन वर्षांपासून (नमुना 8 अ) अतिक्रमण धारक मोजणी शिटची प्रतिक्षा करत असुन भुमिअभिलेख कार्यालय बार्शिटाकळी हे घरकुल धारकांची निराशा करत असुन त्यांची दखल घेण्यास कोणीच तयार नाही. अतिक्रमण (नमुना 8 अ) धारक भुमी अभिलेख कार्यालयात चकरा मारून मारून थकले परंतु उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे थापा मारत आहे हे जर असेच सुरू राहिले तर अतिक्रमण( नमुना 8 अ) धारकांना घरकुलाचा लाभ कधी मिळेल
प्रधानमंत्री आवास योजना 2022 पर्यंतच होती परंतु नगरपंचायत बार्शिटाकळी येथील अतिक्रमण(नमुना 8 अ) धारक उपअधीक्षक भुमीअभिलेख कार्यालयामुळे अद्यापपर्यंत वंचित आहेत
Comments
Post a Comment