आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाउंडेशनच्या वतीने 25 हजार रुपयांची मदत
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाउंडेशनच्या वतीने 25 हजार रुपयांची मदत
माझोड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील विधवा महिला श्रीमती अर्चना लाहुडकर यांना नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाउंडेशनच्या वतीने 25 हजार रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली. ही मदत नामचे विदर्भ व खान्देश समनव्यक हरिष इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली नाम फाऊंडेशनचे जिल्हा समनव्यक माणिक शेळके यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप सावरकर, राजेश ठाकरे, डिगंबर लाहुडकर व दीपक देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment