देशी दारूचा 55 हजार रूपयांचा अवैध साठा जप्त ! बार्शिटाकळीत विशेष पथकाची कारवाई
बार्शिटाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील टी - पॉईंट पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवर देशी दारूची वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून केलेल्या कारवाईत ५५ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षकाच्या विशेष पथकाद्वारे करण्यात आली आहे. बार्शिटाकळी येथुन पिंपळखुटा येथे एक इसम अवैधरित्या देशी दारूची विक्री करीता दुचाकीवर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याच्या माहीतीवरून केलेल्या कारवाईत देशी दारू टॉगो प्रिमीयम, सखु संत्रा, जॅक पॉट,बडी शेप,अशा विविध कंपन्यांचे ४८ नग असा एकूण २ हजार ८८० रूपयांचा तसेच दुचाकी किंमत अंदाजे ५० हजार रुपये असा एकूण ५२ हजार ८८० रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला.तर अमोल बबन धाईत (२४) रा.वंजारी पुरा बार्शिटाकळी या आरोपींवर बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ इ कायद्याच्या अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख तथा पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.
Comments
Post a Comment