रामदास पेठ पोलिसांनी अट्टल चोरट्यास केली अटक

रामदास पेठ पोलिसांनी अट्टल चोरट्यास केली अटक
रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून अवघ्या काहीच दिवसात चोरी गेलेला मुद्देमालासह आरोपीच्या मुसक्या आवळून पोलिसांनी आरोपीस अटक करून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला.

अकोला शहरात चोरीच्या घटनेत अचानक वाढ झाली असून "नजर हटी तो दुर्घटना घटी" याच म्हणी प्रमाणे चोऱ्यांचे सत्र अकोला शहरात सुरू आहे पण जर पोलिसांनी चंग बांधला तर "सुतावरून स्वर्ग गाठत" आरोपीच्या मुसक्या आवल्या जातात याची प्रचिती रामदास पेठ पोलिसांनी दिली आहे. अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात राहणारे ४५ वर्षीय चंद्रकांत रामेश्वर बोडदे हे वॉटर प्यूरी फायर, ऐसी, तसेच आरो रीपेरींग चे काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात ते दिनांक १३ एप्रिल रोजी काही कामानिमित्त टिळक रोड येथील अलंकार मार्केट येथे गेले असता अज्ञात इसमाने त्याची बॅग पळवली बॅगेत त्याच्या कामाचे टूल्स असल्याने तीच बॅग चोरट्याने लंपास केली सदर घटनेची तक्रार चंद्रकांत बिदडे यांनी रामदास पेठ पोलिस स्टेशनला दिली. रामदास पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी सदर घटनेचा तपास करून आपले कर्मचारी कामाला लावले असता ऐक इसम संशयितरित्या टिळक रोड वर फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली हाच तो चोरटा असल्याचा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून आरोपीस विचारपूस केली असता साहेब खान अहमद खान राहणार नवीन बैद पुरा असे या इसमाने आपले नाव सांगितले पोलिसांनी सदर आरोपीची कसून चौकशी केली असता आपणच ती बॅग चोरल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली पोलिसांनी सदर गुन्ह्यात चोरी गेलेले बॅग व इतर साहित्य आरोपी कडून हस्तगत केले असून आरोपी विरोधात रामदास पेठ पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी श्रीधर,अप्पर पोलीस उपाधीक्षक मोनिका राऊत, रामदास पेठ पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शखाली डी बी कर्मचारी विजय सावदेकर, तोहीद अली काजी, संजय अकोटकर, शिवम दुबे, स्वप्नील चौधरी यांनी केली.

*************************

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे