..... म्हणून हे राजकीय 'भोंगे' वाजताहेत! महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र तर शेतक-यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार अपयशी: शेतकरी - सर्वसामान्यांचा सुर
महागाईवर नियंत्रण आणण्यात केंद्र सरकार तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार अपयशी ठरले आहे केंद्र सरकार राज्य सरकार यांचे अपयश यावर चर्चा नको म्हणून हे राजकीय भोंगे वाजत आहेत असा सूर आता राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांतून उमटू लागला आहे.
महागाईवर नियंत्रण अन्यथा केंद्र सरकार तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकार अपयशी ठरले आहे शेतकऱ्यावर गेल्या दोन वर्षांत महापुर,कोरोनासह अनेक आपत्ती आल्या त्यामध्ये पिक विमा योजना राबवणाऱ्या कंपन्या कर्जबाजारी होऊन दिवाळखोरीत निघाले पाहिजे होत्या . मात्र, कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचा नफा कमावला आहे त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना फसवले केंद्र सरकार ,राज्य सरकार यांचे अपयश यावर चर्चा नको म्हणून हे राजकीय भोंगे वाजत आहेत, असा सूर आता शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्यांतून उमटू लागला आहे .
"शेतमाल शेतकऱ्याच्या घरात असतो तेव्हा शेतमालाला योग्य दर नसतो , तीन एकरातील पपई आणि दीड एकरातील उसाचा ट्रॅक्टर फिरवावा लागला .पेट्रोल डिझेलने शंभरी तर घरगुती गॅस सिलेंडरने हजारी पार केली , खाजगी शिक्षण संस्थांनी विद्यार्थी प्रवेश शुल्कात वाढ केली त्यांचे केंद्र आणि राज्य सरकारला काहीच घेणे दणे नाही निवडणुका आल्या की मतांचा जोगवा मागण्यासाठी अनेक योजनांची लालुस दाखवली जाते, असे प्रशांत आबाराव इंगळे या शेतकऱ्यांनी म्हटले आहे "
Comments
Post a Comment