राष्ट्रीय बिरसा क्रांती दलचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ जी मडावी यांची बार्शिटाकळी येथे सभा सभेत तालुकाध्यक्ष पदि योगेश कुरशेंगे,तर बार्शिटाकळी शहर अध्यक्ष पदि शंकर म्हरसकोल्हे यांची नियुक्ती
राष्ट्रीय बिरसा क्रांती दल चे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांची बार्शीटाकली येथे सभा संपन्न प्रतिनिधी , बार्शि टाकळी ,
बार्शिटाकळी शहरातील गवारी पुरा येथे आदिवासी समाज कल्याणा करिता शनिवारी सभा पार पडली.या सभेला राष्ट्रीय बिरसा क्रांती दलचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दशरथ मडावी उपस्थित होते.त्यांनी आदिवासी समाजाला मार्गदर्शन केले. ९ जुन २०२२ रोजी बिरसा मुंडा यांच्या स्मृतिपित्यर्थ आदिवासी सन्मान परिषद यवतमाळ आयोजीत केली आहे , तेंव्हा या परिषेदेला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आदिवासी समाजाचे नेते दशरथ मडावी यांनी केले.सोबतच बिरसा क्रांती दलाचे राज्य उपाध्यक्ष डी.बी.अंबुरे,विदर्भ संघटक अतुल कोवे होते. यावेळी आदिवासी समाजाची विकास बाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी बिरसा क्रांती दलाची शाखा स्थापना करण्यात आली बार्शीटाकली तालुका अध्यक्ष पदी योगेश कुरसेंगे, यांना तसेच शंकरराव मरसकोल्हे यांना शहर अध्यक्ष, म्हणून व अर्चना मसराम यांना तालुका अध्यक्ष महिला फोरम, म्हणुन नियुक्त करण्यात आली. बार्शिटाकळी तालूक्याची पुढील कार्यकारणी लवकरच घोषित करण्यात येणार आहे. आणि पुढच्या तालुका कार्यकारिणी सदस्य तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. सभेला समाजातील लोक उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा क्रांती दल दशरथ मडावी यांनी यावेळी शहरातील आदिवासी बांधवांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी बार्शिटाकळी शहरातील सर्व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते 9 जून रोजी यवतमाळ येथे सादर होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाला बार्शीटाकळी तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती शंकरराव विठोबा मरस्कोल्हे यांनी दिली. यावेळी बंडू मसराम ,योगेश कुरसुंगे, नगरसेवक श्रावण भातखडे ,ज्येष्ठ पत्रकार जेठाभाई पटेल, सामाजीक कार्यकर्ता शाहिद इक्बाल खान, यांची या वेळी उपस्थिती होती. संजय मसराम, बंडू मसराम ,सुनील म्हरसकोल्हे , अनिल म्हरसकोल्हे , जनार्धन उईके, निखिल लोखंडे,रामा डुकरे, शंकर डुकरे,किसन डुकरे, संजय वाघमारे,गुंभा वाघमारे , किसन गोडमल, शांताराम उईके,सचिन वट्टी , किसन उईके, डिगाबर मसराम,चंदु म्हरसकोल्हे,रतन टेकाम,
आदी उपस्थित होते.
छाया , राष्ट्रीय बिरसा क्राती दल राष्ट्रीय अध्यक्ष यांचे ता , पदाधिकारी स्वागत करताना ,
Comments
Post a Comment