शाहु-आंबेडकराच्या वैचारीक वारसदारांना साथ देण्यासाठी सज्ज व्हा......

 इतिहास कुस बदलतो आहे...!! 
---------------------------------------------
                 माणगांवच्या महार परिषदेत  छत्रपती शाहू महाराजांनी डॉ भिमराव रामजी आंबेडकर हे तुमचे नेते आहेत असे महारांना बजावून सांगितले आणि यांच्या पाठिमागे ठामपणे उभे राहण्यातच तुमचं उज्वल भविष्य दडलेलं आहे हेही अधोरेखित केले...!! 
   त्याच बरोबर ब्राम्हण्यवाद्यांशी लढण्यासाठी खंबीर साथीदार म्हणून छत्रपती शाहू महाराजांना विद्वान डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांची साथ हवी होती...!!
  इतिहास  आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, आंबेडकरांनी महाराचेच नव्हे तर तमाम उपेक्षित वर्गाचं नेतृत्व केलं आणि इथल्या रंजल्या गांजलेल्या समुहाला समतेचा हक्क आणि अधिकार मिळवून दिला, त्यांच्या जीवनाचं सोनं केलं...!! 

           छत्रपती शाहू महाराजांच्या अपेक्षेप्रती  डॉ भिमराव रामजी आंबेडकर हे खरे उतरले त्याच बरोबर ब्राह्मण्यवादी छावणीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उध्वस्त करीत समतेचा जागर जागतिक पातळीवर नेऊन ते विश्वरत्न झाले...!! 
   कोरोनाच्या परिस्थिती मुळे  ऐतिहासिक माणगांव महार परिषदेचा शताब्दी सोहळा साजरा करता आला नाही मात्र काल पुन्हा छत्रपती शाहू महाराजांचे वंशज  श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि डॉ भिमराव रामजी आंबेडकर यांचे नातू अॅड बाळासाहेब आंबेडकर हे माणगांव च्या शताब्दी परिषदेत एकत्र आले आणि त्यांनी इतिहासाला उजाळा दिला...!! 
 पहिल्या पिढिचा वैचारिक वारसा दुसऱ्या पिढीने पुढे नेण्याचा संकेत दिला आहे... !! 

   काळ आणिबाणीचा आहे, ब्राम्हण्यवादी मुजोर झाले आहेत आणि आज वेगवेगळ्या छावणीतून लढण्यात अर्थ नाही, इथं मानवतावादी, संविधानवादी,समतावादी विचारांच्या नेत्यांनी एकत्र येऊन ब्राह्मण्यवादी छावणीला टार्गेट करणे काळाची गरज बनली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता शाहू, आंबेडकर एकत्र येऊन ब्राह्मण्यवादी छावणीच्या पुढ्यात ऊभे राहिले तर निश्चितपणे मुठभर मनुवाद्यांना पराभूत करता येईल आणि समतेचा जागर कायम राखता येईल...!! 

   इतिहास कुस बदलतो आहे, शाहू, आंबेडकरांचे वंशज मनुवाद्यांच्या विरोधात एकत्र येऊन लढण्यासाठी सज्ज झाले आहेत...!! 
  महाराष्ट्रातील तमाम फूले शाहू आंबेडकर विचारधारेच्या अनुयायांनो छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांनी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजांनी वैचारिक पातळीवर एकत्र येणे म्हणजे इथल्या मानवतावादी विचाराला बळकटी मिळणे होय....!! 
  डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्यांना इतिहासाचे विस्मरण होते ते इतिहास घडवू शकत नाहीत...!! 
आपणं इतिहास स्मरुन शाहू, आंबेडकर यांच्या वैचारिक वारसांना साथ देण्यासाठी सज्ज होऊ...!! 
   
@.. भास्कर भोजने. सर

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे