१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त दक्षता व जनजागृती अभियान मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
अँटी करप्शन व मीडिया इन्वेस्टीगेशन अकोला द्वारा दिनांक १ मे २०२२ वार रविवार ला महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त दक्षता जनजागृती अभियान या कार्यक्रमाचे आयोजन अकोला बस स्टँड जवळ विश्रामगृहामध्ये सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक तथा पत्रकार गजानन हरणे, विशेष उपस्थिती म्हणून श्री राजू गुल्हाने सहाय्यक कामगार आयुक्त, अनंतराव गणोरकर सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता, दिनकर नागे सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता, बंडूभाऊ देशमुख अध्यक्ष कॉन्ट्रॅक्टर असोसिएस ,अंबादास ऊमाले सरपंच कापसी , राजेश भाऊ राजूरकर समाजसेवाक अदी मान्यवर उपस्थित राहाणार आहे. या कार्यशाळे मध्ये दारूबंदी, दप्तर दिरंगाई, सेवा अधिनियम कायदा, रेशनिंग गॅस यासंबंधीचे कायदा, माहितीचा अधिकार आदी विषयांवर गजानन हरणे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत .तरी जागरूक नागरिक महिला युवक-युवतींनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान अँटीकरप्शन व मिडीया इन्वेस्टीगेशन अकोला यांनी केले आहे.
Comments
Post a Comment