बार्शिटाकळीत कुटार गोदामाला आग

शहरातील नवीन बस स्थानकाजवळ कोहीनुर ट्रेडर्सचे सोयाबीन कुटाराचे दोन मोठे गोदाम आहे. या सोयाबीन कुटाराच्या गोदामास सोमवार 25/ एप्रिल सकाळी 8:00 वाजताच्या सुमारास आग लागली. पातुर आणि अकोला येथुन अग्निशमन दलाची वाहने बोलावुन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक गोदाम आगीपासून वाचवण्यात यश आले आहे तर दुस-या गोदामातील कुटार जळुन खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरात नवीन बस स्थानकाजवळ कोहीनुर ट्रेडर्स हे मो. इकबाल मो.सादिक यांच्या मालकीचे दोन मोठे गोदाम आहेत. या गोदामाला आग लागल्याने गोदामात साठवुन ठेवलेल्या सोयाबीन कुटाराने पेट घेतला. सोमवारी सकाळी 8 घ्या सुमारास शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येते. आगीचे रूद्र रूप धारण केल्याने अकोला व पातुर येथुन अग्निशमन बंब बोलावण्यात आले. 
अग्निशमन दलाच्या जवानांनी केलेल्या परिश्रमामुळे एक गोदाम आगीपासून वाचवण्यात आला. तर दुस-या गोदामातील सोयाबीन कुटार जळुन खाक झाले. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आगीची माहिती मिळताच बार्शिटाकळीचे तहसीलदार श्री गजानन हामद साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....