उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटने ने केला सन्मान
उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटने ने केला सन्मान
बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या वतीने शनिवार दिनांक 30 एप्रिल ला सायंकाळी सहा वाजता प्रभु पार्वती मंगल कार्यालयामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब यांच्या संकल्पनेतून सर्व धर्म समभाव या कार्यक्रमाचे आयोजन बार्शिटाकळी पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री संजय सोळंके तथा पोलीस कर्मचारी यांनी केले होते यावेळी उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटना जिल्हा अकोला च्या वतीने माननीय अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांचा दक्षता समितीच्या महिला पदाधिकारी पुष्पाताई रत्नपारखी , पोलीस पाटील सविताताई भोंगळे , यांनी शाल देऊन सत्कार केला व पेन भेटवस्तू दिली कोरोनाच्या कठीण काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची उत्तम प्रकारे सेवा करणारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी महेश राठोड साहेब , बार्शीटाकळी चे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन हामद साहेब व चांगल्या प्रकारे कायदा-सुव्यवस्था सांभाळणारे व चांगला उपक्रम राबविणारे बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके साहेब यांचा पत्रकार संघटनेचे जिल्हा संयोजक दत्तात्रय भटकर यांनी शाल देऊन सत्कार केला व पेन ही भेटवस्तू दिली यावेळी बार्शिटाकळी शहरातील गुरुदेव सेवा मंडळ यांनी सर्वधर्मसमभाव या विषयावर भजने सादर करून सामुदायिक प्रार्थना सादर केली यावेळी पत्रकार संजय वाट, जेष्ठ पत्रकार जेठाभाई पटेल , शेख इमाम , इरफान भाई , शाहिद इकबाल खान, बार्शिटाकळी शहरातील गुरुदेव सेवा मंडळाचे भजनी मंडळ बार्शिटाकळी शहरातील व विविध गावातील विविध पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते सरपंच पोलिस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष असंख्य पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते अनंता भाऊ केदारे यांनी उत्तम प्रकारे केले आभार प्रदर्शन बार्शिटाकळी चे खुपिया विभाग प्रमुख श्री कीशोर पिंजरकर यांनी केले.
Comments
Post a Comment