शेती आणि उद्योगधंदा हाच आपला खरा धर्म.....कवि विठ्ठल कुलट
शेती आणि उद्दोगधंदा हाच आपला खरा धर्म
जगातील सर्वच धर्मात प्रेम,दया,शांती,सत्य आणि अहिंसा सांगितली आहे.परंतू सध्या काही स्वार्थी विध्वंसक समाजकंटक याउलट सांगून लोकांमध्ये ताण तणाव निर्माण करीत आहेत.त्यांचे अपकृत्य हाणून पाडावे आणि आपण आपल्या शेती आणि उद्दोगधंद्यात लक्ष घालून आपली व देशाची प्रगती करावी,त्यातच आपलं हित आहे आणि तोच आपला खरा धर्म आहे.असे विचार प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष,कवी विठ्ठल कुलट यांनी व्यक्त केले. पणज येथे अकोला पोलिस दल,अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन तथा ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्म समभाव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी रितू खोकर,ठाणेदार नितिन देशमुख, तहसीलदार हरीश गुरव,संदीपपाल महाराज,अक्षय राऊत,सदस्या सौ.सुवर्णा संजय देशमुख,अरूण काकड,पञकार दिनेश बोचे,रतन भोइराज,सरपंच मधुकर कोल्हे,सदस्य गजानन आकोटकर,सचिन कुलट यांची उपस्थिती होती.याप्रसंगी उ.वि.पो.अ.रितू खोकर,तहसीलदार हरीश गुरव,सिराज मौलवी,शीलधम्म भंते,संदीपपाल महाराज,वक्ते अक्षय राऊत,रामपाल महाराज,लेखक शफाकतअली देशमुख,अजमद बेग,इमायत हुसेन,सदस्य,शरदबापू देशमुख, ज्याउद्दीन,उपसरपंच,देवानंद खंडारे, इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केलेत.कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक व राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गणेश इंगळे यांनी केले.तर ठाणेदार नितीन देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत पणजच्या समस्त पदाधिकारी यांनी सहकार्य केले
Comments
Post a Comment