शामराव वाहुरवाघ यांच्या एकसष्टी निमित्ताने देशसेवा करणा-यांचा सत्कार करण्यात आला
शामराव वाहूरवाघ यांचे एकसष्ट निमित्ताने देशसेवा करणा-यांचा सत्कार करण्यात आला
अकोला -दि १७ जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ गतीमान करण्यासाठी करणारे शामराव जयराम वाहुरवाघ यांचे एकसष्ट निमित्ताने दि २०एप्रिल ला दुपारी एक वाजता शिवकल्याणम लाँन,, संत तुकाराम चौक, गोरक्षण रोड, अकोला येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
शामराव वाहुरवाघ ६१वा अभिष्ट चिंतन सोहळा समिती आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बळीराम शिरस्कार, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार हरिदास भदे, बळीराम केले, दिवाकर गावंडे, दिनकर वाघ, सुषमा कावरे,राम मुळे, गजानन निंबोकार महाराज गोपाळ खटाळेई मान्यवर उपस्थित उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील देशसेवा करणारे सैनिक, माजी सैनिक, विद्यानंद इंगळे, कुलदीप गवई,प्रदिप सावळे, पत्रकार समाधान वानखडे, बाळासाहेब ठाकरे, जयप्रकाश पाटील, डॉक्टर महेश लबडे, डॉ रुपेश कळसकर, डॉ राजरत्न वैद्य ,कलावंत समाधान खंदारे, बाबुराव खरात, जयकुमार कावळे, फोटोग्राफर ओलवे,संगम मोहोड सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास अर्चना थोरात, रुपाली वाकोडे, कोकिळा वाहुरवाघ, सुनिता तिरोडा, विद्या अंभोरे, सुषमा राठोड ई उपस्थित होते, शामराव वाहुरवाघ यांनी ग्रंथालयाचे माध्यमातून अनेकांना रोजगार दिला, सामान्य माणसाला बळ देण्यासाठी वाहुरवाघ सतत झटत असतात, त्यांनी केलेला सैनिकांचा सत्कार प्रेरणादायी आहे असे विधान माजी आमदार बळीराम शिरस्कार यांनी यावेळी व्यक्त केले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंगळे तर आभार सुरेंद्र भटकर यांनी मानले,
अभिष्टचिंतन सोहळा समिती आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले,
Comments
Post a Comment