"अत्यंत गरीब परिस्थिती वर मात करून देश सेवेत रूजू झालेल्या कबड्डी खेळाडू शुभांगी घनसावध हिचा वंचित बहुजन युवा आघाडीने केला सत्कार"
अत्यंत गरीब परिस्थिती वर मात करून देश सेवेत रूजू झालेल्या कबड्डी खेळाडू शुभांगी घनसावध हिचा वंचित बहुजन युवा आघाडी ने केला सन्मान"
प्रतिनिधी अकोला दिनांक २६
सहावेळा कबड्डी मध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या कु शुभांगी उत्तमराव घनसावध हिने सशक्त सीमा बलाचे प्रशिक्षण पुर्ण करून बिहार मधील जय नगर येथे नियुक्ती मिळवली आहे.अत्यंत कठीण परिस्थितीत तिने साध्य केलेल्या यशाबद्दल वंचित बहुजन युवा आघाडी चे वतीने आज तिचे कौलखेड येथील निवासस्थानी जाऊन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान करण्यात आला. शुभांगी हीची आर्थिक परिस्थिती बेताची असुनही तिने मेहनत आणि चिकाटी च्या जोरावर हे यश संपादन केले.राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या हस्ते तिचा पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी सचिन शिराळे,जीवन डिगे,रवि वानखडे, प्रविण अहीर, अभिजीत तायडे, उत्तमराव घनसावध,मिलिंद इंगळे, अमोल कदम, सागर तायडे, गणेश घनसावध आदी लोक उपस्थित होते.
Comments
Post a Comment