सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचेतात्कालीन पोलीस निरीक्षक दिनकर महाजन यांना न्यायालयाने एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा
रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एका डॉक्टरला शिवीगाळ केल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक दिनकर महाजन यांना न्यायालयाने एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शहरातील वनविभागा जवळ 2009 मध्ये सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे तात्कालीन पोलीस निरीक्षक दिनकर महाजन यांनी डॉ. मेहरे यांना अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणाची तक्रार रामदास पेठ पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 294 नुसार गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात दोन्ही पक्षांकडील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर प्रथम श्रेणी न्यायाधीश बनसोड यांनी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक श्री दिनकर महाजन यांना दोषी ठरवत एका महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.
Comments
Post a Comment