बार्शिटाकळी येथे अल फ्लाह उर्दू शाळेत जागतीक वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला

अल फ्लाह उर्दू शाळेत जागतिक वसुंधरा दिन साजरा     

बार्शिटाकळी येथे आज खालिद बिन वलीद शिक्षण व कल्याणकारी संस्था व्दारा संचालित अल फ्लाह उर्दू शाळा खडकपुरा येथे जागतिक वसुंधरा दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला  या वेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्राध्यापक बिस्मिल्ला खान हे होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून जेष्ठ पत्रकार जेठाभाई  पटेल  संस्था उपाध्यक्ष शाहिद इक्बाल खान हे होते या वेळी शाहिद इक्बाल खान यांनी उपस्थितांना  माझी वसुंधरा अभियान बद्दल माहिती दिली या वेळी उपस्थित यांना वुक्ष भेट देऊन जल जमीन चे संवर्धना बाबत माहिती देण्यात आली वाढते प्रदूषण आणि अयोग्य जीवनशैली हेच पृथ्वीच्या सद्य:स्थितीमागील मुख्य कारण आहे. आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संरक्षण करण्याचा प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हवा, पाणी, जंगले यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा भसाभस अविचारी वापर केल्याने आणि वाढत्या प्रदुषणाचे परिणाम दिसतच आहेत आणि हे असेच चालू राहिले तर मानवाचेच भविष्य अंध:कारमय आहे  त्या मुळे प्रत्येक नागरिकांनी निसर्गाच्या सर्व संसासाधानाचे बचाव करणे आणि त्याचे संवर्धन करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे या करिता प्रत्यक्ष जल बचाव वुक्षारोपण इत्यादी महत्वा पूर्ण कार्य संस्था मार्फत केल्या जातात त्या निमित्त आज जेष्ठ नागरिकाना वुक्षाचे वितरण करण्यात आले या वेळी मुख्याध्यापक गुलाम फारूक , शब्बीर अहेमद , अब्दुल रशीद , सखा उल्लाह खान , आखतर खान , राहुल्लह खान , वकार खान , आदी  प्रमुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वकार खान यांनी केले.
छाया , वसुंधरा दिन निमित्त वृक्ष भेंट देताना मान्यवरा ,

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे