ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांची लोकसेवा कॅरीयर अकॅडमीला अकोला भेट विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
ऑड. बाळासाहेब आंबेडकर यांची "लोकसेवा करियर अकॅडमीला,अकोला" भेट विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन*
दि.२६ एप्रिल अकोला. व्याळा तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील आदर्श शिक्षक मा. सदाशिवराव वाकोडे यांचे चिरंजीव तथा व्याळा येथील शेतकरी व वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे एक निष्ठ कार्यकर्ते मा.नंदकिशोर वाकोडे यांचे लहान बंधू उच्च विद्याविभूषित प्रा्डॉ .गजानन सदाशिवराव वाकोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बहुजन समाज हा शिक्षण क्षेत्रात पुढे जावून प्रगती केली पाहिजे शिक्षणाचे बाजारीकरण न करता खरोखर लोकांची सेवा घडावी या उद्देशाने *लोकसेवा अकॅडमी* सुरू केलेली आहे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे. *शिकेल तो टिकेल* या तत्त्वावर शिक्षणाचे महत्त्व प्रत्येकांना सांगितले त्याच तत्त्वप्रणाली नुसार डॉ. गजानन वाकोडे यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केलेली आहे
भारतातीलच नव्हे तर जगातील ही एकमेव अकॅडमी आहे जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सुरू झाली आहे.या अकॅडमी ला आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज *ॲड. बाळासाहेब आंबेडकर* यांनी क्लासमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सदरील कार्यक्रमास मा.प्रमोद भाऊ देंडवे (जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ),मा.गजानन दांडगे (जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी) व अकॅडमीतील प्रा.सोनवणे, प्रा.मनोज भगत व योगेश सोनोने , माणिक शेळके, श्रीकृष्ण देवकुंणबी व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित राहून कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाची प्रास्ताविका व संचलन आंतरराष्ट्रीय व्याख्याते व लोकसेवा करिअर अकॅडमीचे संचालक प्रा.डॉ.गजानन वाकोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.रोशनी वाकोडे मॅडम यांनी केले. *माझ्या जीवनाचा सार संविधानाचं पहिलं पान* असं म्हणत विद्यार्थ्यांच्या बहु उपस्थितीमध्ये कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...
Comments
Post a Comment