नायब तहसिलदार हरिश गुरव यांच्या एसीबी ची कारवाई
नायब तहसीलदार हरिश गुरव यांच्या वर एसीबी ची कारवाई .
29, एप्रिल 2022
नायब तहसीलदार वर एसीबी ची कारवाई
अकोला जिल्हा प्रतिनिधी = अकोट अकोला जिल्ह्यातील एक असे शहर ज्यामध्ये मोठे विषयी उदयास येतात. त्यामध्ये राजकारण असो की कायदा सुव्यवस्था किंवा भ्रष्टाचार अकोट तहसील कार्यालयात कार्यरत असलेले व न.प. प्रशासकीय पदाचा कार्यभार असलेले हरीश गुरव नायब तहसीलदार या अधिकाऱ्याने वाळूच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपये लाच मागितली तक्रारदार या बाबीला बळी न पडता थेट लाचलुचपत विभाग कडे जाऊन तक्रार केली. आज रोजी सायंकाळी 10000 रुपयाची तडजोड करून 8 हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात या अधिकाऱ्याला पकडले.
नायब तहसीलदार हरीश गुरव यांच्याकडे आज रोजी तहसील कार्यालयात चार अन्य विभागाचा नायब तहसीलदार पदाचा चार्ज आहे..
नायब तहसीलदार गुरव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई मा. विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक लप्रवि. अमरावती मा. अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक लप्रवि अमरावती.मा. देविदास घेवारे अप्पर पोलीस अधीक्षक लप्रवि अमरावती. यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सचिन सावंत पो.नि. नरेंद्र खैरनार.पो.ना. प्रदीप गावंडे.पो. शि. निलेश शेगोकार यांनी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणारे लोकसेवक बद्दल अँटी करप्शन ब्युरो अकोला यांच्याशी संपर्क साधावा.
Comments
Post a Comment