निराधार परिवाराला मदतीचा आधार, जिल्हा परिषद सदस्य शंकर ईगळे यांनी घेतला पुढाकार , ग्रामपंचायत चा मिळाला आधार

निराधार परीवाराला मदतीचा आधार, जि. प. सदस्य शंकर इंगळे यांनी घेतला पुढाकार, ग्रामपंचायतचा मिळाला आधार

अकोला दि. 25 एप्रिल :- पतीचे दुर्धर आजाराने निधन झालं पतीच्या अचानक निघून जाण्याने श्रीमती सीमा बाबुलाल घोडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला कर्ता पुरुष गेल्याने बेसहारा झालेल्या सीमाताई यांना पती गेल्यानंतर एक 8 वर्षीय मुलगा व दोन लहान - लहान गोंडस मुले त्याचे पालन पोषण कसे करावे हा मोठा प्रश्न, राहण्यासाठी असलेले ताट्टयाच्या घराचा आसरा उन, वारा, पाऊस यापासून घरासह परीवाराचे संरक्षण महत्त्वाचे त्यातच स्वतः चे व मुलांचे संगोपन, उदरनिर्वाह, शिक्षण, आरोग्य, याची काळजी त्यातच घराच्या चार भिंती व छत कसे उभारावे हा प्रश्न कर्ता पुरुष गेल्याने मुलांसह निराधार झालेल्या श्रीमती सीमा बाबुलाल घोडे यांच्यासमोर मोठा यक्ष प्रश्न....! 
अशातच गट ग्रामपंचायत आपातापा सचिव संजय डी. श्रीवास, सरपंच सौ. स्वाती सतिष टोबरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी चर्चा विचारविनिमय करून अशातच फुल नाही फुलाची पाकळी या नात्याने गट ग्रामपंचायत आपातापा ने या निराधार परीवाराला मदतीचा प्रयास करीत असल्याच्या बाबीची माहिती कर्तव्यदक्ष व सदैव तत्पर असलेले कोळी महादेव समाज सामाजिक कार्यकर्ता तथा वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा परिषद सदस्य शंकर इंगळे यांना आपातापा गट ग्रामपंचायत येथे ग्रामसभा मध्ये मिळताच त्यांनी क्षणांचाही विलंब न करता निराधार घोडे परीवाराला मदतीचा हात पुढे केला असून 25 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या हस्ते नविन घर बांधकामांचे भूमीपूजन करण्यात आले आहे. 

यावेळी जि. प. सदस्य शंकर इंगळे, सचिव संजय डी. श्रीवास, सरपंच सौ. स्वाती सतिष टोबरे, पत्रकार संघटना अध्यक्ष विजय देशमुख, ग्रा. पं. सदस्य प्रमोद बोपटे, रंजना बोपटे, ग्रा.पं. कर्मचारी दादाराव आपोतीकर, रोजगार सेवक भास्कर बोपटे, संगणक परीचालक संगीता कुटेमाटे, सामाजिक कार्यकर्ता सतिष टोबरे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे