अवघ्या वयाच्या सहा वर्षीच अकसा तय्यबा यांनी ठेवला प्रथम रोजी (उपवास)
सहा वर्षीय अकसा तय्याबा यांनी ठेवले प्रथम रोजा उपवास
प्रतिनिधी बार्शिटाकळी
सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे रमजान महिन्यात प्रत्येक मुस्लिम बांधव अल्लाह ताला ची श्रद्धा साठी दिवसभर काही न खाता पिता उपवास रोजा ठेवतात व रात्री तराबी ची नमाज पाठन करतात बार्शीटाकळी शहरातील खडकपुरा येथील केवळ सहा वर्षीय वय असलेल्या अकसा तय्याबा आरिफ खान यांनी अत्यंत कमी वयातच रोजा उपवास ठेवल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे सध्या पवित्र रमझान महिन्या चा पंचविस वा रोजा सुरू असून,अकसा तय्याबा यांनी आज आपल्या जीवनातील प्रथम उपवास रोजा ठेवले होते अकसा तय्याबा आरिफ खान हे बार्शिटाकळी तंटामुक्ती अध्यक्ष यांची मुलगी असून माजी ग्राम पंचायत सदस्य ताहेर आली खान मेम्बर यांची नात आहे मुस्लीम बांधव पवित्र रमजान महिन्यात संपूर्ण तीस दिवस रोजा उपवास ठेवतात व तिसव्या दिवशी रमजान ईद साजरी करतात सद्या उष्णता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अश्यातच सुद्धा अल्लाह ची श्रद्धा साठी संपूर्ण मुस्लीम बांधव महिनाभर उपवास ठेऊन अल्लाह ताला ची प्रार्थना करतात अकसा तय्याबा यांनी अवघ्या आपल्या वयाच्या सहाव्या वर्षी उपवास ठेवल्याने सर्वत्र त्यांचे प्रशंसा होत आहे बार्शिटाकली नगर पंचायत चे नगर पंचायत चे प्रभाग क्रमांक 11च्या नगरसेविका लाईका खान ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहम्मद अयाज , जफर उल्ला खान , सलाम उल्लाह खान , लियाकत पहिलवान, शब्बार उल्लाह खान , वकार खान , गोहर अली खान , मुक्तसिर खान, नाशिरोद्दीन , आदीनि त्यांचे अभिनंदन केले आहे
Comments
Post a Comment