नरवीर शिवाजी काशीद व छत्रपती संभाजी महाराज जयंती तसेच अखिल भारतीय जीवा सेना संघटनेचा 20 वा वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा संपन्न

नरवीर शिवाजी काशीद व छत्रपती संभाजी महाराज जयंती तसेच अखिल भारतीय जीवा सेना संघटनेचा 20 वा वर्धापन दिन कार्यक्रम सोहळा संपन्न. 
नांदेड: छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षक प्रतिशिवाजी म्हणून ओळखणारे नरवीर शिवाजी काशिद व छत्रपती संभाजी महाराज जयंती तसेच *अखिल भारतीय जिवा सेना* या सामाजिक,पुरोगामी संघटनेचा 20 वा वर्धापन दिन सोहळा श्री सेना महाराज सभागृह नवीन कवठा, नांदेड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अखिल भारतीय जिवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर होते.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय जिवा सेनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रा.राजकुमार गाजरे होते.सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रदेश प्रवक्ते प्रा.गोविंद दळवी तसेच फुले शाहू आंबेडकरी विचारवंत अक्षयकुमार ढोके,माजी नगरसेवक नगरपरिषद मुखेड अडवोकेट कमलेशकुमार चौदंते हे होते.तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय जिवा सेनेचे राष्ट्रीय सचिव प्रा. डॉ. दत्ता कुंचलवाड,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिनेशजी महाले, कर्मचारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मण कोंडावार, प्रदेश सचिव लक्ष्मण लिंगापुरे तसेच बसव, शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे गाढे अभ्यासक,लेखक,व्याख्याते प्रा. आनंद कर्णे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय जिवा सेना नांदेडचे अध्यक्ष बालाजी हाळदेवाड, कर्मचारी महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सतीशचंद्र शिंदे व युवा जिल्हा अध्यक्ष आकाश सैदमवार यांनी केले.सदर कार्यक्रमास महाराष्ट्रातून राष्ट्रीय कार्यकारिणी, प्रदेश कार्यकारणी,कर्मचारी महासंघ कार्यकारणी,विभागीय कार्यकारणी तसेच जिल्हा कार्यकारणी,तालुका कार्यकारणी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्हा उस्मानाबाद येथून मराठवाडा उपाध्यक्ष जिवश्री अक्षय धाकतोडे,जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे,उ.बाद तालुका सचिव बाळासाहेब शेटे, तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष गोवर्धन क्षीरसागर,उ.बाद तालुका सहसंघटक मनोज लाडूळकर, उ.बाद शहर संपर्कप्रमुख गोविंद साडेकर,उ.बाद तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रशांत लाडुळकर, नाभिक समाज बांधव विकास वाघमारे,प्रवीण लाडुळकर,संदीप धाकतोडे, राम पवार हे सर्व उपस्थित होते.अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा उ.बाद यांच्या वतीने २० व्या वर्धापन सोहळ्यासाठी एकूण रू आर्थिक निधी देण्यात आला 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे