44 डिग्री सेल्सियस उष्ण तापमाना मध्ये दगडपारवा येथील शेतकऱ्यांचा मिश्र शेतीचा अनोखा प्रयोग
44 डिग्री सेल्सियस उष्ण तापमाना मध्ये दगडपारवा येथील शेतकऱ्यांचा मिश्र शेतीचा अनोखा प्रयोग
अकोला जिल्ह्यांमध्ये माहे एप्रिल व मे महिन्यामध्ये 44 व 45 डिग्री सेल्सिअस उष्णतामान गेले. अशा उष्ण तापमानामध्ये शेती कशी करावी अशा प्रकारचा प्रश्न शेतकर्यांसमोर पडतो. त्यामध्ये आमच्या दगडपारवा तालुका बार्शीटाकळी येथील शेतकरी.शंकरराव कावरे व पुरुषोत्तम घोगरे
यांनी मिश्र शेतीचा एक अनोखा प्रयोग याठिकाणी करून आपले केळीचे व टरबुजाचे पीक जगवून एक आदर्श निर्माण केल्याचे आपल्याला पाहायला मिळते
दगडपारवा तालुका बार्शिटाकळी येथे एक मध्यम स्वरूपाचे धरण आहे त्या धरणामध्ये पाणी साठा उपलब्ध आहे त्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीला मुबलक स्वरूपाचं पाणी पाहायला मिळते त्याच पाण्याचा वापर करून आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची शेती करू शकतो अशा प्रकारचा संकल्प श्री शंकरराव कावरे आणि.पुरुषोत्तम घोगरे
यांनी केला. त्यांनी या शेतामध्ये केळीचे व टरबुजाचे पीक व जगवून भर उन्हाळ्यामध्ये शेतीचे पीक जिवंत ठेवलेले पाहायला मिळतात.
श्री शंकरराव कावरे यांच्या शेतात केळीचे पिक बाल्यावस्थेत असताना उन्हामध्ये तग धरू शकत नाहीत. म्हणून केळीच्या पिकाच्या आजूबाजूने त्यांनी बरु चे पीक लावले, बरू पिकाच्या आच्छादनामुळे केळीच्या पिकांना सावली मिळाली. आणि केळीचे पीक भर उन्हाळ्यात सुद्धा जिवंत राहिलेली पाहायला मिळतात आणि जसा उन्हाळा संपला तसेही हिरवीगार भरुच पीके त्याची कापणी करून त्या शेतामध्ये टाकून त्या क्षेत्रामध्ये बरू च्या पिकाचे खत तयार होते त्यामुळे येणाऱ्या पुढील पिकाची सुद्धा उत्पादन वाढीस मदत होते.
तसेच श्री..पुरुषोत्तम घोगरे ..यांचे शेत त्यामध्ये त्यांनी टरबूजां चे पीक घेतले टरबूज सुद्धा नदीनाले काठा मध्ये येतात गाळ मिश्रीत जमिनीमध्ये येतात त्या पिकांना सुद्धा उष्णतामान मानवत नाही म्हणून टरबुजाच्या पिकांना सुद्धा सावली मिळाली पाहिजेत त्यासाठी त्यांनी बरु चे पीक लावले आणि टरबुजाच्या पिकांना सावली देऊन टरबुजाचे पीक भर उन्हाळ्यामध्ये चांगल्याप्रकारे जगवली. टरबूज सुद्धा एवढे चांगल्या प्रकारची आलेली आहेत कोणत्याही प्रकारचं टरबूज त्याठिकाणी तोडले तर अतिशय लाल रंगाची टरबूज पाहायला मिळाले. आणि त्याच ठिकाणी टरबूज खाण्याचा आनंद घेतला. विशेष करून या शेतातून मिळणाऱ्या टरबूजापासून बार्शीटाकळी ते महान रस्त्यावर रसवंती टाकून टरबुजा पासून टरबुजाचा ज्यूस तयार करून ज्यूस विकून त्यापासून चांगल्या प्रकारे त्यांना उत्पन्न मिळत आहे. आणि आपल्या भागांमध्ये टरबुजाचा ज्यूस मिळतो यामुळे सर्वसामान्य नागरिक सुद्धा टरबुजाचा ज्यूस आनंदाने पिताना पाहायला मिळाले. आणि आम्ही सुद्धा टरबुजाच्या ज्यूस सा त्या ठिकाणी आस्वाद घेतला.
अशाप्रकारच्या प्रयोगशील शेतकऱ्यांची नवीन संकल्पना पाहून मनाला खूप आनंद झाला. आणि भर उन्हात सुद्धा दौरा केल्यानंतर उन्हाचे चटके जरी बसलेले असतील तरी मात्र अशा प्रकारचे हिरवगार शेत पाहून मन अतिशय आनंदून गेलं आणि नवीन पाहायला मिळाले त्याचा त्याचा आनंद झाला.
आपली शेती ही मान्सूनवर आधारित शेती आहे. त्यामुळे आपले पीक हे फक्त चारमाही एक पीक घेतली जातात . परंतु ज्या ठिकाणी पाणी आहे व जलसिंचनाची सोय आहे अशा ठिकाणी भर उन्हाळ्यात सुद्धा पिक घेऊन आपली शेती बारमाही शेती करून आपण उत्पन्न कमावू शकतो. हे दगड पारवा येथील शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे त्यामुळे त्यांचा मला अभिमान वाटला आणि म्हणून आम्ही त्यांचं जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करतो. आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन जिथे सिंचणासाठी पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी अशा प्रकारची मिश्र शेती केल्यास उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण पिकाचे उत्पादन घेऊन आपले उत्पन्न वाढू शकतो अशाप्रकारचे आशावादी चित्र या माध्यमातून मला पाहायला मिळाले, त्याबद्दल दोन्ही शेतकऱ्याचे मनपूर्वक अभिनंदन
प्रा संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी अकोला
13 मे 2022 ला बार्शीटाकळी तालुक्यात दौऱ्यावर असताना आलेला अनुभव, त्यावेळी तहसीलदार गजानन हामंद व श्रावण भराडी, व कैलास कदम ....... मंडळ अधिकारी, व गावातील इतर शेतकरी हजर, होते, ज्यांचे शेत होते त्यांची भेट शेतात होऊ शकली नाही
Comments
Post a Comment