बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. उद्धव गाडेकर महाराज यांच्या परिवाराचे सांत्वन
बाळासाहेब आंबेडकर यांनी केले उद्धव गाडेकर महाराज यांच्या परिवाराचे सांत्वन
अकोट
बाल अवस्थेपासून मुलांमध्ये संस्कार घडविणे आवश्यक असून राष्ट्रनिर्मितीकरीता महत्वाचे आहे. डॉ. उद्धवजी गाडेकर यांनी संत तुकडोजी महाराजाचे विचार बालअवस्थेपासूनच मुलांमध्ये रुजविण्याचे काम केले. त्यांचे हे काम मोलाचे असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा.बाळासाहेब आंबेडकर यांनी पाटसूल येथे केले.
अकोट तालुक्यातील पाटसूल येथे डॉ. उद्धवजी गाडेकर महाराज यांच्या परिवारास बाळासाहेब आंबेडकर यांनी सांत्वनपर भेट दिली. त्यांचे समवेत प्रदिप वानखडे, प्रमोद देंडवे, काशीराम साबळे, अशोक दारोकार, विकास पवार,मो.सलिमभाई, सुरेंद्र भोजने. आदी उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी डॉ. उद्धवजी गाडेकर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रद्धाजंली वाहिली. डॉ. उद्धवजी गाडेकर महाराजांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार व मुलांमध्ये संस्कार घडविण्याचे कार्य मोलाचे असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळी केले.
Balasaheb Ambedkar
#VBA
Comments
Post a Comment